• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वरवेली आगरवाडी येथे शिवजन्मोत्सव

by Ganesh Dhanawade
April 2, 2024
in Guhagar
85 1
6
Shivjanmatsava at Varaveli

आगरवाडी विकास मंडळाच्या वतीने आगरवाडी वरवेली येथे शिवजयंती उत्सवा निमित्त उपस्थित असलेल्या माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचा सत्कार करताना मान्यवर

167
SHARES
478
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वरवेली येथील आगरवाडी विकास मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव आणि श्री सत्यनारायणाची महापुजा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. Shivjanmatsava at Varaveli

शिवजयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी गोपाळगड, अंजनवेल ते वरवेली आगरवाडी “शिवज्योत दौड”, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, श्री ग्रामदेवता हसलाई देवी पालखीची मिरवणूक, श्री सत्यनारायण महापुजा, वाडीतील मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप, दुपारी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, महाआरती, सुस्वर भजन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. Shivjanmatsava at Varaveli

या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, आरे सरपंच समित घाणेकर, प्रशांत विचारे, गुहागर नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, सरपंच नारायण आगरें, पत्रकार गणेश किर्वे, तंटामुक्त समिती अध्यक्ष वैभव पवार, तेलीवाडी अध्यक्ष दीपक किर्वे, मधुकर बारगोडे, ग्रामपंचायत सदस्य नरेश रांजाणे, श्रावणी शिंदे, संदीप पवार, सेजल शिंदे, शैलेश नारकर, अरूण रावणग, संतोष रांजाणे गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर रात्री श्री आई सोळ‌जाई नाट्य नमन मंडळ देवरुख (पर्शुराम वाडी मावळती) यांचे बहुरंगी नमन काल्पनिक वगनाट्य “एक धूर्त कावा” अर्थात “वणवा पेटला सुडाचा “कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आगरवाडी विकास मंडळ आणि आगरवाडी महिला मंडळ यांनी मेहनत घेतली. Shivjanmatsava at Varaveli

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarShivjanmatsavaShivjanmatsava at VaraveliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share67SendTweet42
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.