नवीन चेहराच या मतदार संघात बदल करू शकतो; तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर
गुहागर, ता. 05 : येथील जनता आजी माजी आमदारांना कंटाळली आहे. यासाठी नवीन चेहरा हवा आहे. याकरीता आम्ही उद्योजक विपुल कदम यांच्याकडे उमेदवार म्हणून पहात असून तशी आग्रही मागणी आम्ही वरिष्ठांकडे केली आहे. यामुळे युतीमधून गुहागर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचाच उमेदवार असणार आहे, असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांनी व्यक्त केला. Shiv Sena’s claim on Guhagar assembly constituency
गुहागर तालुका शिवसेना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, शहरप्रमुख नितेश मोरे, अमरदिप परचुरे, संदिप भोसले, रोहन भोसले, मनीष मोरे आदीं पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. आतापर्यंत महायुतीमधून गुहागर विधानसभा मतदार संघ हा धनुष्यबाण चिन्ह असलेल्या शिवसेनेच्याच हक्काचा राहीला आहे. मागील प्रत्येक निवडणूकीत शिवसेनेच वरचढ राहीली असून महायुतीमधून गुहागर विधानसभा मतदार संघासाठी शिवसेनेचाच उमेदवार दयावा, अशी आम्ही आग्रही मागणी यावेळी केली आहे. Shiv Sena’s claim on Guhagar assembly constituency


यावेळी दिपक कनगुटकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांनी गुहागरसाठी अडीच कोटीचा निधी दिला. तर पुन्हा एक कोटी सत्तर लाखाचा निधी देत आहेत. तसेच मतदार संघासाठी मोठ्याप्रमाणात निधी दिला असून या मतदार संघावर पालकमंत्री याचबरोबर स्वताः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष आहे. आपल्या पक्षाची गुहागर व शृंगारतळी येथे कार्यालय होत आहेत. गुहागर विधानसभा मतदार संघ हा युतीमधून शिवसेनेच्या हक्काचा आहे. गेल्या तीन टर्मचा विचार करता शिवसेनेला चांगले मताधिक्य मिळाले आहेत. गत निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान आमदारांना पराभव दिसू लागल्यावर त्यांनी इतर कोणत्याही पक्षात न जाता राष्ट्रवादीमधून थेट शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. आज अंजनवेल येथे करासंदर्भात बैठक घेतली आहे. मात्र कर मिळवीण्यासाठी कोणी प्रयत्न केले ते अंजनवेलवासीयांना माहीत आहे, असा टोला लगावताना केवळ श्रेय घेण्यासाठी आमदारांचा खटाटोप सुरु असल्याचे सांगितले. एकाबाजुला निधी मिळत नाही म्हणतात. मात्र दुसरीकडे त्याच निधीवर स्वतःकडे काम घेण्यासाठी दावा करतात. यांना महामार्गाच्या रखडलेल्या कामाचे कोणतेच सोयरसुतक नाही, अशी टीका त्यांनी केली. Shiv Sena’s claim on Guhagar assembly constituency
या मतदार संघात सुसज्ज हॉस्पिटल व रोजगारासाठी एमआयडीसी आणण्यासाठी पालकमंत्री आग्रही आहेत. गुहागरवर दावा करणे आमचा अधिकार आहे. परंतु महायुतीमधून जो उमेदवार देतील त्याला कोणत्याही परिस्थितीत निवडून आणू असेही यावेळी बोलताना श्री. कनगुटकर यांनी सांगितले. Shiv Sena’s claim on Guhagar assembly constituency