शिवसेनेचे निवेदन, आंदोलनाचा इशारा
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील जनतेला आलेल्या वीज बीलांची वाढीव रक्कम तसेच अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम रद्द करावी. अन्यथा गुहागर तालुकावासीयांना घेवून शिवसेना वीज कार्यालयावर धडक मोर्चा घेवून येईल. असे निवेदन आज गुहागर तालुका शिवसेनेतर्फे महावितरणच्या गुहागर व्यवस्थापकांना देण्यात आले. Shiv Sena statement on electricity bill
तालुक्यातील अनेक ग्राहकांना वाढीव बीले देण्यात आली आहेत. तसेच एकदा अनामत रक्कम वसुल केल्यानंतर पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने अतिरिक्त सुरक्षा रक्कमेचा अंतर्भाव महावितरणच्या बीलात करण्यात आला आहे. याबाबतची माहिती जनतेतून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे पोचली. पदाधिकाऱ्यांनी तातडीने याबाबतची खातरजमा करुन घेतली. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरण विद्युत महामंडळाच्या गुहागर व्यवस्थापकांची आज भेट घेतली. वाढीव वीज बीले आणि अतिरिक्त सुरक्षा अनामतबाबत व्यवस्थापकांना निवेदन दिले. Shiv Sena statement on electricity bill
या निवेदनात म्हटले आहे की, वाढीव वीज बीले कमी करण्यात यावीत. अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम रद्द करण्यात यावी. अन्यथा समस्त गुहागर तालुकावासीय वीज ग्राहकांना घेवून आपल्या वीज कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात येईल. तसेच गुहागर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल. तरी या निवेदनाचा विचार करुन त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. हे निवेदन देताना शिवसेना गुहागर तालुका प्रमुख दिपक कनगुटकर, सचिव संतोष आग्रे, गुहागर शहर प्रमुख निलेश मोरे, उपतालुका प्रमुख महेश जामसूतकर, विभागप्रमुख संदिप भोसले, राकेश साखरकर यांच्यासह युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते. Shiv Sena statement on electricity bill