• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

परदेशातही निनादला शिवरायांचा सूर

by Ganesh Dhanawade
February 24, 2024
in News
103 1
0
Shiv Raya's jubilation abroad
202
SHARES
576
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महाराष्ट्रतील तरुणांनी युरोपमध्ये साजरी केली शिवजयंती

गुहागर, ता. 24 : महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या आनंदोत्साहात साजरी होत असतानाच, परदेशातही शिवगर्जनेने आसमंत दणाणून सोडला. महाराष्ट्राप्रमाणे युरोप देशात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती स्लोवाकी येथील जग्वार लँड रोव्हर या जगप्रसिद्ध कंपनीत नोकरीला असलेल्या शिवभक्तांनी उत्साहात साजरी झाली. Shiv Raya’s jubilation abroad

Shiv Raya's jubilation abroad

शिवजयंती निमित्त सकाळी महाराजांची प्राणप्रतिष्ठापना, आरती, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे चरित्र सांगितले. याबाबत गुहागर मधील निखिल रेवाळे यांने सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटले की एक वेगळाच जोश स्फुरत असतो. गुहागरमध्ये असताना शिवतेज फाउंडेशन तर्फे गेली अनेक वर्षे शिवरथ यात्रा मोठ्या दिमाखात काढली जाते. या शिवरथ यात्रेत सहभागी होत असे. जगामध्ये कुठेही असलो तरी शिवजयंती साजरी करायची या उद्देशाने आम्ही सर्वांनी मिळून युरोपमध्ये शिवजयंती साजरी केली. परदेशातील शिवजयंती सोहळ्याचा अनुभव आणि विशेष करून परदेशातील शिवजयंतीचा अनुभव हा शब्दांमध्ये सांगता येणार नाही तर, तो प्रत्यक्ष घेतला गेला पाहिजे. तसेच येणाऱ्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व त्यांचा इतिहास पोचावा. यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्‍यक असल्याचे निखिल याने सांगितले. Shiv Raya’s jubilation abroad

Shiv Raya's jubilation abroad

निखिल याच्या सोबत प्रशांत कोरडे, निखिल बोरडे, केतन सोनार, तन्मई सुतार, पल्लवी राठोड, वैष्णवी सोहनी, प्राजक्ता गायकवाड, जयेश शेलार, प्रशांत भाते, चेतन जाधव, अलिषा भालेराव आदींनी या शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. Shiv Raya’s jubilation abroad

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarShiv Raya's jubilation abroadUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share81SendTweet51
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.