• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे विद्यालयात शिवजयंती साजरी

by Ganesh Dhanawade
February 22, 2024
in Guhagar
128 1
0
Shiv Jayanti in Patpanhale School

Shiv Jayanti in Patpanhale School

251
SHARES
717
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांच्या अध्यक्षतेत श्रीछत्रपती शिवाजी महाराज जयंती श्रीशिव छत्रपती सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी श्रीछत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, ऐतिहासिक कार्य, वीर-पराक्रमाचे प्रसंग व घटना यांवर उत्स्फूर्तपणे वकृत्व सादर केली. वकृत्व सादर करणाऱ्या व कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांनी विशेष अभिनंदन केले. Shiv Jayanti in Patpanhale School

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात श्रीछत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मान्यवर मुख्याध्यापक, प्राध्यापक,  शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी यांचे शाब्दिक स्वागत करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून मुख्याध्यापक व्ही.डी. पाटील, ज्येष्ठ प्रा.जी.डी.नेरले, माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण, उच्च माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सौ.एम.एस.जाधव, शिक्षक एस.वाय.भिडे हे मान्यवर तसेच बहुसंख्य प्राध्यापक व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. Shiv Jayanti in Patpanhale School

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस. चव्हाण यांनी अन्यायाविरुद्ध लढणारे शिवाजी महाराज, बालपणीचे संस्कार, चालते – बोलते विद्यापीठ , शिवाजी महाराजांमध्ये निर्णय, धाडस, नेतृत्व, नाविन्यता, गनिमी कावा, उत्तम प्रशासन चालवणे, योग्य नियोजन व योजना दूरदृष्टीकोन ठेवणे तसेच शिवाजी राजे हे जाणते व रयतेचे राजे, शूरवीर, पराक्रमी व संस्कारक्षम राजे, रयतेचा आदर करणारे राजे,  शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्याची  निर्मिती, शिवाजी महाराजांचे आदर्श राज्य, विविध गड किल्ल्यावर गेल्यावर ऐतिहासिक पराक्रमांची व घटनांची मिळणारी प्रेरणा तसेच राजे व मावळ्यांच्या कार्याची होणारी जाणीव, शिवाजी महाराजांनी स्थापलेले अष्टप्रधान मंडळ आदी विषयांबाबत मार्गदर्शन केले. Shiv Jayanti in Patpanhale School

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त विद्यालयातील कु. हर्षिता पवार , विणा देसाई, कस्तुरी वझे, शमिका भिडे, समृद्धी आंबेकर, मानसी पालकर, वैष्णवी जागृष्टे , आकांक्षा मोहिते , मृण्मयी जाधव , दीप्ती खांबे , कस्तुरी साळवी , कु.शार्दुल ओक , पियुष चव्हाण व अथर्व विचारे यांनी शिवाजी महाराजांचे बालपण ,  ऐतिहासिक कार्य , वीर-पराक्रमाचे प्रसंग व घटना आदी विषयांवर वकृत्व सादर केली. कु. पियुष चव्हाण व अथर्व विचारे यांनी शिवगर्जना सादर करून कार्यक्रमात शिवमय वातावरण निर्मिती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी एस. एम.आंबेकर यांनी केले. सौ.ए. आर.चव्हाण यांनी  मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या सहकार्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. Shiv Jayanti in Patpanhale School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarShiv Jayanti in Patpanhale SchoolUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share100SendTweet63
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.