गुहागर, ता. 05 : तालुक्यातील तवसाळ गावातील फाग पंचमीला पहिली होळी पेटवून सुरुवात होते. त्यानंतर महामाई सोनसाखळी, देव रवळनाथ, त्रिमुखी सोमजाई यांचा जोगवा घेऊन तिसऱ्या दिवशी भोवनीचे खेळे गाव भेटीसाठी बाहेर पडतात. पाच दिवस गाव भेट झाल्यावर तवसाळ पंचक्रोशीचे एकुण १२ होम साजरे होतात तर ९ होम वाडीवाडीत साजरे होतात. Shimgotsavam of Tavasal Sonsakhli Devi


गुरुवार दिनांक 13/03/2025 रोजी रात्री 10.30 वाजता देवीचा रूपा लागेल व त्या नंतर मंदिरातून पालखी होमावर जाईल. शुक्रवार दिनांक 14/03/2025 सकाळी 10.30 वाजता श्री महामाई सोनसाखळी मंदिर परिसरात जत्रा भरते. पुढे पालखी मंदिरातून हळदी कुंकवासाठी तवसाळ खुर्द गावात येईल. पहाटे पर्यंत हळदी कुंकू तवसाळ खुर्द मध्ये फिरवली जाते. शनिवार दिनांक 15/03/2025 सकाळी 11 वाजता पालखी होमावर जाईल नंतर 12 वाजता होम पेटवला जाईल. पालखी फेरी बोटीतून परंपरे नुसार समुद्रात नारळ अर्पण करण्यासाठी घेऊन जातात हे फेरीबोटील विहंग द्रृष पहायला मिळते.अनेक बाजुच्या गावातील मंडळी या उत्सवात सामील होत असतात ढोलाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक सोहळा रंगतो. Shimgotsavam of Tavasal Sonsakhli Devi


त्यानंतर तवसाळ ग्रामस्थ मंडळाचा तमाशा होतो. दुपारी 2 वाजता पालखी सहाणेवर येईल त्यानंतर पालखी दुपारी 3.30 वाजता तवसाळ आगर मध्ये होमावर जाईल, व सायंकाळी पालखी तवसाळ खुर्द गावाच्या सहानेवर विराजमान होईल. अशा प्रकारे तवसाळ गाव पंचक्रोशीचा पारंपरिक शिमगोत्सव साजरा केला जातो. तरी सर्व भाविकांनी श्री देवी महामाई सोनसाखळी देवीच्या पालखी दर्शनाचा लाभ घ्यावा व शिमगोत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन केले आहे. Shimgotsavam of Tavasal Sonsakhli Devi