• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री देवी महामाई सोनसाखळी देवीच्या शिमगोत्सवाला  प्रारंभ

by Guhagar News
March 5, 2025
in Guhagar
76 1
0
Shimgotsavam of Tavasal Sonsakhli Devi
150
SHARES
428
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05 : तालुक्यातील तवसाळ गावातील फाग पंचमीला पहिली होळी पेटवून सुरुवात होते.  त्यानंतर महामाई सोनसाखळी, देव रवळनाथ, त्रिमुखी सोमजाई यांचा जोगवा घेऊन तिसऱ्या दिवशी भोवनीचे खेळे गाव भेटीसाठी बाहेर पडतात. पाच दिवस गाव भेट झाल्यावर तवसाळ पंचक्रोशीचे एकुण १२ होम साजरे होतात तर ९ होम वाडीवाडीत साजरे होतात. Shimgotsavam of Tavasal Sonsakhli Devi

गुरुवार दिनांक 13/03/2025 रोजी रात्री 10.30 वाजता देवीचा रूपा लागेल व त्या नंतर मंदिरातून पालखी होमावर जाईल. शुक्रवार दिनांक 14/03/2025 सकाळी 10.30 वाजता श्री महामाई सोनसाखळी मंदिर परिसरात जत्रा भरते. पुढे पालखी मंदिरातून हळदी कुंकवासाठी तवसाळ खुर्द गावात येईल. पहाटे पर्यंत हळदी कुंकू तवसाळ खुर्द मध्ये फिरवली जाते. शनिवार दिनांक 15/03/2025 सकाळी 11 वाजता पालखी होमावर जाईल नंतर 12 वाजता होम पेटवला जाईल. पालखी फेरी बोटीतून परंपरे नुसार समुद्रात नारळ अर्पण करण्यासाठी घेऊन जातात हे फेरीबोटील विहंग द्रृष पहायला मिळते.अनेक बाजुच्या गावातील मंडळी या उत्सवात सामील होत असतात ढोलाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक सोहळा रंगतो. Shimgotsavam of Tavasal Sonsakhli Devi

Shimgotsavam of Tavasal Sonsakhli Devi

त्यानंतर तवसाळ ग्रामस्थ मंडळाचा तमाशा होतो. दुपारी 2 वाजता पालखी सहाणेवर येईल  त्यानंतर पालखी दुपारी 3.30 वाजता तवसाळ आगर मध्ये होमावर जाईल, व सायंकाळी पालखी  तवसाळ खुर्द गावाच्या सहानेवर विराजमान होईल. अशा प्रकारे तवसाळ गाव पंचक्रोशीचा पारंपरिक शिमगोत्सव साजरा केला जातो. तरी सर्व भाविकांनी श्री देवी महामाई सोनसाखळी देवीच्या पालखी दर्शनाचा लाभ घ्यावा व शिमगोत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन केले आहे. Shimgotsavam of Tavasal Sonsakhli Devi

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarShimgotsavam of Tavasal Sonsakhli DeviUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet38
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.