गुहागर. ता. 06 : तालुक्यातील पेवे गावची केदारनाथ झोलाई देवीच्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून देवी भोवणीसाठी बाहेर पडली आहे. ही एकमेव बारा गाव बाराकोंडात फिरणारी आई आहे. तिचा हा शिमग्याचा भोवणी प्रवास राना वनातून देव खेळी घेऊन फिरत असतात. ही देवी परचुरी, पांगारी, विसापूर, कारूळ, पवार साखरी, रानवी, अंजनवेल, वेलदुर, नवानगर, धोपावे, त्रिशूल साखरी, तळवली या गावी फिरते. Shimgotsav of Kedarnath Zolai Devi at Peve


पेवे गावच्या झोलाई देवीच्या शिमगोत्सवाला सुरूवात झाली असून मंगळवार दि. 04 रोजी देवळातून पालखी बाहेर पडून पेवे खरेकोंड वस्ती बुधवार दि.05 रोजी परसुरी गाव घेवून भुवडवाडी येथे वस्ती करून आज गुरुवार दि. 06 रोजी विसापूर गाव घेवून ब्राह्मणवाडी येथे वस्ती करेल. शुक्रवार दि. 07 रोजी कारुळ गाव घेऊन पालखी गवळीवाडी मध्ये वस्ती करेल. शनिवार दि. 08 रोजी पवार साखरी, रानवी (कातळवाडी) तील घरे घेईल. रविवार दि. 09 रोजी पालखी कातळवाडी, बोरभाटला, अंजनवेल घेऊन चावडीवर वस्ती करेल. सोमवार दि. 10 रोजी पेवे पालखी, अंजनवेल पालखी, वेलदूर पालखी, या तिन्ही पालखींची भेटाभेट होऊन घरटवाडीमध्ये वस्ती करेल. मंगळवार दि. 11 रोजी पालखी नवानगर मध्ये वस्ती करेल. बुधवार दि. 12 रोजी कालिका माता देवीची भेटाभेट होऊन धोपावे येथे वस्ती करेल. गुरुवार दि. 13 रोजी मोरावणी वरून सानेवर होमाचा कार्यक्रम होईल. शनिवार दि. 15 रोजी पेवे पालखी, त्रिशूलसाखरी खेम झोलाई देवी पालखी या दोन्ही पालखींची भेट होईल. रविवार दि. 16 रोजी त्रिशूल साखरी गवळीवाडी पालकोट घेऊन सहानेवर वस्ती करेल. सोमवार दि. 17 रोजी पालखी तळवली गाव घेऊन सहाणेवर वस्ती करेल. मंगळवार दि. 18 रोजी पेवे सहानेवर वस्ती करेल. बुधवार दि. 19 रोजी पेवे सहान येथे रंगपंचमी कार्यक्रम होऊन पारदळेवाडी येथे वस्ती होईल. गुरुवार दि. 20 रोजी पारदळेवाडी, सुतारवाडी घेऊन पारदळेवाडी येथे वस्ती करेल. शुक्रवार दि. 21 रोजी गवळीवाडी मध्ये वस्ती करेल. शनिवार दि. 22 रोजी पाष्टेवाडी घेऊन शिगवणवाडीमध्ये वस्ती करेल. रविवार दि. 23 रोजी गणेशवाडी मध्ये वस्ती सोमवार दि. 24 रोजी खामशेत कुंभारवाडी घेऊन तळवली गावची सुकाई देवी पालखीची भेटाभेट (भडकंबा वस्ती) मंगळवार दि. 25 रोजी पेवे खरेकोंड वस्ती करेल. बुधवार दि. 26 रोजी पेवे गुरवकोंड वस्ती गुरुवार दि. 27 रोजी आमशेत, राबभोईवाडी, डाफळेवाडी, सुतारवाडी घेऊन गुरवांकडे वस्ती करेल. शुक्रवार दि. 28 रोजी सुतारवाडी पेवेकरवाडी घेऊन शेलकोंडीवर देवाचा नैवेद्य घेऊन शिंपणे कार्यक्रम करून देवीची पालखी देवळात येईल. शनिवार दि. 29 रोजी सर्व भोवणी करून आणलेल्या वस्तू व हिशोब करून 2 वाजता शिंपणे होईल. तसेच वरील कार्यक्रमात फेरबदल करण्याचा अधिकार ट्रस्टला राहील. Shimgotsav of Kedarnath Zolai Devi at Peve