गुहागर, ता. 20 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी-बाबरवाडी, तवसाळ खुर्द, तवसाळ पडवे, तवसाळ मोहीतेवाडी, तवसाळ आगर (रोहीले), तांबडवाडी बौद्धवाडी, तवसाळ बौद्धवाडी २ वाड्या अशा संपूर्ण भागात शिमगोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. गावच्या परंपरेला अनुसरून १२ शिमगेचे होम करण्यात आले. त्यापैकी ९ होम विविध ठिकाणी पार पडले, तर ३ होम आई श्री महामाई सोनसाखळी देवीच्या चरणस्पर्शाने साजरे करण्यात आले. Shimgotsav celebrated at Tavasal


शिमगोत्सवाची सुरुवात दि. १३ मार्च २०२५ रोजी रात्री उशिरा गावातील देवतांना रूपे लावून पालखीत विराजमान करण्यात आले. आई श्री महामाई सोनसाखळी मंदिर परिसरात रात्री १२ वाजता होमाला आग लावण्यात आली. यावेळी महामाई सोनसाखळी देवीचे मानकरी श्री राजेश रमेश गडदे, तवसाळ गावचे खोत व गावकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. Shimgotsav celebrated at Tavasal


१४ मार्चच्या सकाळी भाविक दर्शनासाठी येत होते. पालखी सहानेवर विराजमान होती. यावेळी तवसाळ खुर्द येथे देवीच्या पालखीचा हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर संपूर्ण गावात देवीच्या दर्शनासाठी घरोघरी फेरी काढण्यात आली. त्यानंतर पालखी जयगड खाडी येथे फेरी बोटीने नेऊन नारळ अर्पण करण्यात आला. लोकश्रुतीनुसार, देवी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी समुद्रमार्गे जात असल्याची परंपरा आजही जिवंत ठेवली जाते. परत आल्यावर ११ व्या होमाची विधीवत सांगता झाली. तमाशा या नृत्य प्रकाराचा आनंद घेण्यात आला. यानंतर रोहीले बीच (तवसाळ आगर) येथे पालखी नाचविण्याचा विधी पार पडला. Shimgotsav celebrated at Tavasal


शिमगोत्सवानंतर पालखी दि. ३० एप्रिल २०२५ (अक्षय तृतीया) पर्यंत तवसाळ खुर्द सहानेवर ठेवण्यात येते. त्यानंतर गावातील प्रत्येक घरात दर्शन यात्रेचा प्रारंभ होतो. हा शिमगोत्सव तवसाळ पंचक्रोशीत संस्कृतीचे जतन, परंपरांचा सन्मान आणि समाजाची एकजूट यांचा सुंदर मिलाफ या उत्सवाच्या माध्यमातून अनुभवता आला.या सोहळ्याचे फोटोग्राफी प्रणय सुर्वे, हर्षद सुर्वे, दिपक जोशी, प्रितम सुर्वे तसेच सोशल मीडिया प्रसार माध्यम DJ सचिन कुळये यांनी विशेष योगदान दिले. Shimgotsav celebrated at Tavasal