गुहागर, ता. 16 : नवरात्रात कोकणात घटस्थापना पहिल्या दिवशी प्रारंभ करताना सात प्रकारे धान्याची पेरणी करण्यात येते दसराच्या दिवशी हे बियाणे अंकुर ( रो-व ) उपटून देवाला वाहण्याची पिढ्यांन पिढ्या भक्तीमय प्रथा आजही कोकणात ग्रामीण भागात गावोगावी जोपासली जाते. घट-स्थापन करण्यासाठी सुपिक माती भरलेली ( टोपली – परडी ) मातीत धान्य मिसळून चवळी,नाचणी, वरी, पावटे, उडिद, भात, जोंधळे अशी सात प्रकारे धान्य पेरण्यात आली होती. नऊ दिवस अखंडित दिप तेवत ठेवला जातो. प्रत्येक घराण्याची एक विशिष्ट कुळदैवत असते. काही ठिकाणी माळ चढवली जाते. अंगणात शेनाने सारवुन सुबक रांगोळी काढली जाते तर काही ठिकाणी वडीलोपार्जित कडक दसरा चा विधी म्हणून दान देण्यात येते. नवरात्र उठेपर्यंत दररोज तिची षोड्शोपचार पूजा केली जाते. घटावर रोज एक याप्रमाणे झेंडूच्या, तिळाची फुलांची नऊ माळ घटावर पसरवून त्यावर रोज पाणी शिंपडण्यात येते. Sharadotsav in Tavasal School


नवरात्रात घटस्थापना हा मुख्य विधी असतो. यावेळी देव्हाऱ्यातील चांदीची देवींच्या मूर्ती स्वच्छ पाण्यात घासून धुवून घेण्यात आल्या. त्यांना पुन्हा स्थापन करून त्यांची पूजा करण्यात आली तर दसराच्या पुर्वसंध्येला घटी उठवताना परंपरागत पुजा करुन देव्हारातील सात देवांपैकी एका देवाला नैवेद्य दान म्हणून आरवता कोंबड्याचा बळी दिला जातो. अशी रुढी परंपरा आहे. तर ( रो-व ) आजुबाजुच्या गावात वाटला जातो. त्या सुहासिनीची खणा नारळाची ओटी भरली जाते. त्याओटीतील प्रसाद म्हणून धान्य शिजवून नैवेद्य दाखवला जातो अशी अख्यायिका आहे. तर आपट्याची पाने सोनं म्हणून सर्वांनच्या घरोघरी वाटली जातात. घटस्थापना झाल्या नंतर शाळेय सरस्वतीचे आगमन होते. हा शारदीय उत्सव तीन दिवस सर्व शाळांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. Sharadotsav in Tavasal School


तवसाळ तांबडवाडी मध्ये सर्व नियोजन शाळा कमिटी शिक्षक पालक वर्ग आणि ग्रामस्थ यांच्या सहयोगाने वाजत गाजत लेझीम नृत्य सादर करत सर्व विद्यार्थी आणि महिला मंडळ ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. नंतर सर्व मुलांनी पाटी पुजन करत देवीला नमस्कार केला. आलेल्या महिलांनी पारंपरिक गाणी गात फेर धरून शारदे मातेला विनवणी केली. सोबत मुलांनी जाकडी नाच, मुलींनी टिपरी नाच आनंदोत्सव साजरा करत रात्री रास गरबा खेळण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित पहायला मिळाली. शेवटी विसर्जन सोहळा निमित्ताने ग्रामस्थ महिला युवा वर्ग युवती दुपारी रास गरबा खेळून आरती करत शारदीय सरस्वती मूर्ती विसर्जन करण्यात आली. Sharadotsav in Tavasal School