बॅंक ऑडिट, आयकर, टीडीएसवर चर्चासत्र
रत्नागिरी, ता. 02 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे बँक ऑडिट, आयकर आणि टीडीएस यावर नुकतेच हॉटेल विवेक येथे चर्चासत्र घेण्यात आले. पुण्यातील सीए ऋता चितळे आणि रत्नागिरीतील सीए अनुप शहा यांनी यावेळी मार्गदर्शन केले. Seminar organized by CA Ratnagiri branch


प्रास्ताविक करताना शाखेचे अध्यक्ष सीए मंदार जोशी यांनी नवीन कार्यकारिणीच्या काळातील हा पहिलाच कार्यक्रम असून यापुढेही अशी विविध चर्चासत्रे आयोजित करणार असून याचा सभासदांनी लाभ घ्यावा, असे सांगितले. सीए इन्स्टिट्यूटतर्फे घेण्यात येणारा कृत्रिम बुद्धिमत्तेवरचा कोर्स देखील रत्नागिरीतील सीएंसाठी शाखेतर्फे घेण्यात येईल, असे सांगितले. Seminar organized by CA Ratnagiri branch


प्रथम सत्रात सीए ऋता चितळे यांनी बँक ऑडिट करत असताना घ्यावयाची काळजी, बँक ऑडिट रिपोर्टमधील बदल, बँक ऑडिट करत असताना द्यावी लागणारी विविध प्रमाणपत्रे याबद्दल माहिती दिली. द्वितीय सत्रात सीए अनुप शहा यांनी नवीन इन्कमटॅक्स बिलमधील महत्त्वाचे बदल विशद केले. त्यामधील सीएंची भूमिका विशद केली. त्यांनी येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी टीडीएसमधील महत्त्वाचे बदल आणि त्यासाठी आपल्या कामकाजामध्ये करावे लागणारे बदल याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए शैलेश काळे यांनी केले. कार्यक्रमासाठी शाखेचे उपाध्यक्ष सीए केदार करंबेळकर, सचिव सीए अक्षय जोशी, खजिनदार सीए नचिकेत जोशी, सभासद सीए शरदचंद्र वझे यांचे सहाय्य लाभले. Seminar organized by CA Ratnagiri branch