वेळणेश्वर परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयचे आयोजन
गुहागर, ता. 18 : दरवर्षी १४ डिसेंबर रोजी संपूर्ण भारतातील लोक ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन’ ((National Energy Conservation Day)) साजरा करतात. अक्षय ऊर्जेचा वापर करुन, संपुष्टात येणाऱ्या ऊर्जेचे स्त्रोत हे जपुन वापरायला हवेत, असा संदेश या दिवसाच्या माध्यमातुन दिला जातो. या दिनाचे महत्व ओळखून महर्षि परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वरच्या वतीने “ऊर्जा संवर्धन ” या विषयावर कनिष्ठ महाविद्यालय पालशेत येथील ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रासाठी ४५ विद्यार्थी उपस्थित होते. Seminar on National Energy Conservation Day
प्राध्यापिका प्रिती साठे आणि प्राध्यापिका साक्षी तांबे या चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून उपस्थित होत्या. चर्चासत्राच्या पहिल्या सत्रामधे प्राध्यापिका प्रीति साठे यांनी मुलांना आपण ऊर्जा संवर्धन दिन का साजरा करतो, ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जेचे प्रकार इत्यादि बद्दल मागदर्शन केले. दुस-या सत्रामधे प्राध्यापिका साक्षी तांबे यांनी उर्जा कशी वाचवायची आणि आपण उर्जेचे संवर्धन का केले पाहिजे, यावर चर्चा केली. Seminar on National Energy Conservation Day


भारतातील राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन म्हणजे ऊर्जाबचत व लोकांना संरक्षण या बाबी महत्वाच्या आहेत. भविष्यामध्ये कार्यक्षमतेने ऊर्जा वापरणे अत्यंत आवश्यक आहे. ऊर्जा संवर्धन नियोजनाच्या दिशेने अधिक परिणामकारक परिणाम प्राप्त करण्यासाठी, प्रत्येक व्यक्तिच्या वागणुकीत ऊर्जा संवर्धन करणे आवश्यक आहे. नैसर्गिक स्त्रोत जसे की जीवाश्म इंधन, क्रूड तेल, कोळसा, नैसर्गिक वायू इ. येत्या काळात संपुष्टात येतील. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा सारख्या ऊर्जासंधारणाच्या नव्या साधनांचा वापर करण्याची गरज आहे. चर्चासत्रामध्ये कनिष्ठ महाविद्यालय पालशेत येथील विद्यार्थी, प्राध्यापक, तसेच प्राचार्य मनोज जोगळेकर यांनी सहभाग घेतला. हे सत्र यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी, विद्युत् विभाग प्रमुख श्री सतीश घोरपडे, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. गणेश दिवे यांचे मार्गदर्शन लाभले. Seminar on National Energy Conservation Day