रत्नागिरी, ता. 22 : बँक ऑडिट करताना आरबीआय, सरकार आणि बँक यांच्या सीएकडून काय अपेक्षा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी सीएंनी आपल्या कामाचं नियोजन करावे आणि परिणामकारक पद्धतीने आपले काम पूर्ण करावे. दरवर्षी ऑडिटमध्ये काही नवीन गोष्टी येत असतात. त्याचा अभ्यास करून आवश्यक गोष्टींना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन सीए निरंजन जोशी यांनी केले. सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे बँक ऑडिट, ऑडिट स्टँडर्ड, इन्कम टॅक्स मधील नवीन कर पद्धत, धर्मादाय संस्थांनी घ्यावयाची काळजी यावरील एक दिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते. Seminar by CA Institute
हा कार्यक्रम हॉटेल विवा एक्झिक्युटीव्ह येथे झाला. यावेळी जिल्ह्यातील पन्नास सीए उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. या वेळी सीए जोशी, शाखेच्या अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सचिव सीए केदार करंबेळकर, कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी, सदस्य सीए प्रसाद आचरेकर आणि सीए मुकुंद मराठे उपस्थित होते. Seminar by CA Institute
प्रास्ताविकामध्ये शाखेच्या अध्यक्षा सीए अभिलाषा मुळ्ये म्हणाल्या की, सीए इन्स्टिट्यूटने २०२४-२५ वर्षासाठी दृष्टी या नावाने आराखडा तयार केला आहे. तंत्रज्ञान आपल्या कामात कसा सकारात्मक बदल घडवू शकते यावर त्यात भर देण्यात आला आहे. यावर्षी सीए इन्स्टिट्यूटतर्फे प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर राष्ट्रीय पातळीवर एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे. आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कमिटी मेंबर्स तसेच उपस्थित सीएंचे आभार मानले. सूत्रसंचालन सीए धनश्री करमरकर यांनी केले. Seminar by CA Institute
पहिल्या सत्राचे अध्यक्ष सीए अँथोनी राजशेखर यांनी आपल्याला आलेले काही अनुभव सांगितले. ज्येष्ठ सीए शशिकांत काळे यांनी देखील को- ऑपरेटिव्ह बँक आणि त्यांना येणाऱ्या काही अडचणींबाबत आपले अनुभव सांगितले. दुसऱ्या सत्रात सीए निरंजन जोशी यांनी ऑडिट स्टँडर्डबद्दल बोलताना प्रामाणिकपणे काम पूर्ण केलं हे सिद्ध करण्याची गरज सीएंना सध्याच्या काळात असल्याचे सांगितले. त्यासाठी ऑडिट स्टँडर्ड कशी उपयोगी असतात हे विशद केलं. सोप्या पद्धतीने आपण त्यांचे पालन कसं करू शकतो हे सांगितले. सीए प्रसाद आचरेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधत रत्नागिरीतील सीएंना येणाऱ्या काही शंका, समस्यांबद्दल प्रश्न विचारले. चर्चासत्रात सहभागी झाल्याबद्दल मानधन किंवा भेट न घेता सीए निरंजन जोशी यांनी सीए मदत निधीला देणगी देत अभिनव पायंडा पाडला, त्याबद्दल शाखेचे कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी यांनी विशेष आभार मानले. Seminar by CA Institute
तिसऱ्या सत्रात सीए अनुप शहा यांनी आयकरामधील जुनी व नवीन करपद्धत यावर मार्गदर्शन केले. या दोन्ही पद्धती सोप्या असून जुन्यातून नवीन मध्ये किंवा नवीनमधून जुन्यामध्ये संक्रमण करणे ही प्रक्रिया जास्त किचकट असल्याचे सांगितले. यावर्षी विवरणपत्र दाखल करताना त्या आधी फॉर्म १०१ ईए दाखल करणे तेवढेच महत्त्वाचे आहे व तो दाखल करताना काय काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. धर्मादाय संस्थाना आयकरातून सवलत मिळते, मात्र त्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित असते. हे पालन करत असताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय यावर बोलताना त्यांनी सीएंनी काय काळजी घेणं गरजेचं आहे, यावर मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात सीए मंदार गाडगीळ यांनी अध्यक्षस्थान भूषविले. आभार प्रदर्शन सीए अक्षय जोशी यांनी केले. Seminar by CA Institute