शरदचंद्रजी पवार कृषी व सलग्न महाविद्यालय खरवते
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवक पदाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते मधील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी यश संपादन करून त्यांची पुणे ग्रामीण, रत्नागिरी आणि कोल्हापूर विभागात निवड करण्यात आली आहे. Selection for Krishi Sevak post
यामध्ये प्रा.भारत सरोदे ( प्राध्यापक, कृषी कीटक शास्त्र) व प्रा.प्रियांका लोहार ( प्राध्यापिका, वनस्पती विकृती शास्त्र) कु. शुभम चोगले (अन्न तंत्रज्ञान शाखा), कु.स्नेहल गालवे (कृषी शाखा), कु.श्रेयस भांबुरे (कृषी शाखा), कु.संकेत इंगळे (उद्यान विद्या शाखा) यांची निवड झाली आहे. सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डेचे कार्याध्यक्ष मा. शेखर निकम, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांनी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील यांनी या सर्वांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले. तसेच या सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Selection for Krishi Sevak post