राष्ट्रीय सुरक्षा दिन उत्साहात, नियमांचे पालन करणाऱ्यांचा पुरस्कार
गुहागर, ता. 11 : तालुक्यात कार्यान्वीत असलेल्या आरजीपीपीएल प्लांट मँनेजमेंटतर्फे दि. ४ मार्च रोजी ५३ वा राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. यावेळी सीआयएसएफच्या (निमलष्करी) अग्निशमन जवानांकडून सुरक्षेचा संदेश देण्यात आला. यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्यावतीने सेफ्टी या विभागावर एक नाटक सादर करण्यात आले. Security message from CISF of RGPPL
या कार्यक्रमात प्लाँटच्या विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध एजन्सींनी सहभाग घेतला होता. सुरक्षा नियमांचे पालन करण्यात अव्वल असलेल्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या बालभारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना व आरजीपीपीएल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के. तखेले यांनी सेफ्टी या विभागावर मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे सहाय्यक कमांडेंट सोनू शर्मा, तांत्रिक विभागप्रमुख डी. सुरेश आदी मान्यवर उपस्थित होते. Security message from CISF of RGPPL