तवंग प्रकरणी ‘गुहागर न्यूज’च्या पाठपुराव्याला यश
(बातमीखालील चौकटीमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा. आपली प्रतिक्रिया गुहागर न्यूजसाठी महत्त्वपूर्ण आहे. )
गुहागर, ता. 16 : आज महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अजय चव्हाण यांनी आज गुहागरच्या समुद्रावर येवून पाण्याचे नमुने घेतले. समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या तवंगाबाबत गुहागर न्यूजने आवाज उठविला होता.
Today Maharashtra Pollution Control Board (MPCB) Field Officer Ajay Chavan visited Guhagar Beach. They took polluted water samples from Sea Waves. Guhagar News had raised the issue of Oil Spill coming to the beach.
गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर तवंग येत असल्याबाबत गुहागर न्यूजने दोन वेळा ( 8 जून व 14 जून) बातम्या दिल्या. प्रत्यक्ष समुद्रावरील तवंगांचे व्हिडिओ प्रसिध्द केले. या बातम्यांची दखल अखेर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अजय चव्हाण आणि कर्मचारी संकेत कदम बुधारी (ता. 16) गुहागरमध्ये दाखल झाले. गुहागर न्यूजच्या प्रतिनिधीसह समुद्रावर जावून त्यांनी तवंग मिश्रीत पाण्याचे नमुने घेतले.
आता समुद्र खवळू लागल्याने तवंग सतत जागा बदलत आहे. त्यामुळे तवंगाची घनता पूर्वी इतकी दिसून येत नाही. तसेच लाटा उंच उसळत असल्याने आणि पाण्याचा वेग वाढल्याने थेट तवंगापर्यत पोचून त्याचे नमुने घेणेही प्रदुषण नियंत्रण मंडळाला शक्य नव्हते. तरीही तासभर प्रयत्न करुन संकेत कदम यांनी तवंग मिश्रीत पाणी गोळा केले. तसेच क्षेत्र अधिकारी अजय चव्हाण यांनी समुद्राच्या लाटांबरोबर येणारे काळे पाणी सहज तपासून पाहिले. तेव्हा या पाण्याला चिकटपणा नव्हता. वेगळा वासही येत नव्हता. नमुना म्हणून कॅनमध्ये भरलेले पाणी हिरवट रंगाचे दिसत होते. त्यामुळे हा तवंग तेलाचा नसावा. समुद्रातील हालचालींमुळे तळाशी असलेली घाण किंवा समुद्रातील घाण एकत्रीतपणे समुद्रातून बाहेर पडत असावी. असा प्राथमिक अंदाज अजय चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात यामध्ये कोणते घटक आहेत. याचे अधिकृत उत्तर प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच देता येईल. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी गुहागर नगरपंचायतीचे कर्मचारी ओंकार लोखंडेही उपस्थित होते.
संबंधित बातम्या
गुहागरच्या समुद्रात तवंगाचे प्रमाण वाढले
गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर तेलाचा तवंग
Oil Spill On Guhagar Beach