अजय चव्हाण : नमुने तपासणीसाठी न्यावे लागतील
गुहागर, ता. 14 : गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर चार भागात तेलाचा तवंग आढळून आला आहे. आठ दिवसांपूर्वीही असाच तवंग दिसला होता. मात्र आजतागायत या तवंगाबाबत महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. आज प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आमच्याकडे याबाबत कोणतीही तक्रार झालेली नाही. तवंगाची काही नमुने तपासासाठी न्यावे लागतील. त्यानंतरच याबाबत बोलणे उचित ठरले अशी प्रतिक्रिया अजय चव्हाण यांनी व्यक्त केली.
Oil slicks have been found in four areas on the coast of Guhagar. A similar Oil slick was seen eight days ago. Today, the Maharashtra Pollution Control Board Officer Ajay Chavan told, we have not received any complaint in this regard. Some samples of Oil Slick will have to be taken for testing. Only then did it become appropriate to talk about it.
गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर बाजारपेठ ते वरचापाट मोहल्ला या परिसरात चार ठिकाणी तेलाचा तवंग असलेल्या लाटा पहायला मिळत आहे. आठ दिवसांपूर्वी केवळ वरचापाट परिसरातील एकाच भागात या लाटा दिसत होत्या. यावेळी तेलाच्या तवंगाचे प्रमाणही जास्त आहे.
याबाबत तहसीलदार सौ. लता धोत्रे म्हणाल्या की, स्थानिकांकडून या विषयाची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर प्रदुषण मंडळाला या संदर्भात माहिती देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) चिपळूण कार्यालयातील अधिकारी अजय चव्हाण म्हणाले की, आठ दिवसांपूर्वी एकदा याबाबत चर्चा ऐकली होती. हा तवंग कशामुळे येतो याची माहिती घेतली पाहिजे. मागे तवंग आला तेव्हा आम्ही चौकशी केली. त्यावेळी आरजीपीपीएल व्यवस्थापनाला कळवले होते. मात्र कोणतीच तक्रार न आल्याने हा विषय थांबला. आता पुन्हा तवंग येत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळही या विषयात बोलणे झाले आहे. तवंगचे नमुने तपासणीसाठी नेल्यानंतरच त्याच्या अहवालातून हा तवंग ऑईल, ग्रीस किंवा अन्य कोणता आहे ते समजेल. त्यानंतर तो कोठून आला याचीही माहिती घ्यावी लागेल. जिल्ह्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यावर असा तवंग आढळत आहे का याची माहिती घेण्यास आम्ही सुरवात केली आहे. त्यानंतरच याबाबात कोणती कार्यवाही करायची हे ठरवता येईल.