• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिल्पकार जयदीप आपटे याला अटक

by Guhagar News
September 5, 2024
in Guhagar
119 1
1
233
SHARES
665
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05 : राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे याला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्त्वाखालील पोलिसांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटेला कल्याणमधील राहत्या घरातून ताब्यात घेतले. यापूर्वी मालवण पोलिसांचे पथक जयदीप आपटे याच्या घरी आले होते. तेव्हा घराला कुलूप होते. परंतु, बुधवारी जयदीप आपटे अचानक आपल्या राहत्या घरी अवतरला आणि अलगद पोलिसांच्या हाती लागला. जयदीप आपटे याला ताब्यात घेतल्यानंतर तातडीने सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना करण्यात आले. Sculptor Jaideep Apte arrested

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्टला कोसळला होता. तेव्हापासून जयदीप आपटे हा फरार होता. अनेक दिवसांच्या शोध मोहिमेनंतरही पोलिसांना त्याचा पत्ता लागला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकार आणि गृहमंत्रालयावर टीकेची झोड उठवली होती. पोलिसांनी जयदीप आपटे याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथकं विविध ठिकाणी शोध घेत होती. जयदीप आपटे इतके दिवस हाती लागत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. परंतु, बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटे अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास पुढे सरकण्याची शक्यता आहे. Sculptor Jaideep Apte arrested

जयदीप आपटे हा पोलीस चौकशीत शिवाजी महाराजांच्या 28 फुटी ब्राँझच्या पुतळ्याबाबत काय माहिती देणार, हे पाहावे लागेल. या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आणि पुतळ्यासाठी निकृष्ट साहित्य वापरल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्याबाबत जयदीप आपटे काय बाजू मांडणार, हे बघावे लागेल. याशिवाय, जयदीप आपटे याला भारतीय नौदलाने शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम कोणाच्या माध्यमातून दिले, हेदेखील आता समोर येण्याची शक्यता आहे. मालवण पोलिसांकडून आता जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील  यांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल. या चौकशीतून शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना नेमकी कोणती चूक झाली, याचे कारणही समोर येऊ शकते. Sculptor Jaideep Apte arrested

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSculptor Jaideep Apte arrestedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share93SendTweet58
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.