अध्यक्षपदी शीर हायस्कूलचे जी. एल. पाटील
गुहागर, ता. 01 : गुहागर तालुका विज्ञान शिक्षक मंडळाची सभा नुकतीच युनिटेक कॉम्प्युटर सेंटर शृंगारतळी येथे संपन्न झाली. या सभेमध्ये २०२४ ते २०२७ या तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी मंडळ गठीत करण्यात आले. गुहागर तालुका विज्ञान शिक्षक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्षपदी श्री. जी एल. पाटील (शीर हायस्कूल) यांची निवड करण्यात आली. Science Teacher New Executive
या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष पदी श्री. पराग कदम (मुंढर हायस्कूल), श्री. शेख मुनावर (शृंगारी उर्दू हायस्कूल), सचिवपदी श्री. के. डी. शिवणकर (पाटपन्हाळे हायस्कूल), सहसचिव श्री. ढवळ (आबलोली हायस्कूल), खजिनदार श्री. सौदागर (महात्मा फुले पाचेरी आगर हायस्कूल), महिला प्रतिनिधी म्हणून सौ. कनगुटकर (गुहागर हायस्कूल), कार्यकारणी सदस्य श्री. सलगर (वाघांबे हायस्कूल), श्री. लादे (वेळणेश्वर हायस्कूल), श्री. ढेंबरे (पालशेत हायस्कूल), श्री. राऊत (देवघर हायस्कूल), श्रीम. कांबळे अंजनवेल हायस्कूल, श्रीम. जैतपाल – (पाटपन्हाळे इंग्लिश मीडियम हायस्कूल), श्री. परचुरे (गुहागर हायस्कूल) यांची निवड करण्यात आली. Science Teacher New Executive
सदर संघटनेच्या सल्लागारपदी श्री. बी. बी. खाडे (कुडली हायस्कूल), श्री. आबासाहेब कदम (हेदवी हायस्कूल) यांची निवड करण्यात आली. गुहागर तालुका विज्ञान शिक्षक मंडळातर्फे आगामी काळात नविन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना लाभ होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. Science Teacher New Executive