• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 April 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विज्ञान रंजन परीक्षेत आर्या गोयथळे प्रथम

by Guhagar News
January 17, 2023
in Guhagar
112 1
0
Science entertainment exam
219
SHARES
626
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 :  शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरची कुमारी आर्या मंदार गोयथळे हिने विज्ञान रंजन परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ यांच्यावतीने दुसऱ्या टप्प्याची ही परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा दिनांक ७ जानेवारी 2023 रोजी रत्नागिरी आणि चिपळूण या दोन परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. Science entertainment exam

 विज्ञान रंजन परीक्षेचे पहिल्या टप्प्याची परीक्षा नुकतीच पार पडली. त्यामधील जिल्ह्यातील तालुक्यांमधील प्रथम तीन क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा दुसऱ्या टप्प्यात घेण्यात आली .दुसऱ्या टप्प्याची परीक्षा केंद्र रत्नागिरी जागुष्टे हायस्कूल कुवारबाव मध्ये संगमेश्वर ,रत्नागिरी ,लांजा, राजापूर, या तालुक्यातील शाळांचा समावेश होता .तर चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षा केंद्रामध्ये चिपळूण, गुहागर, दापोली, खेड, मंडणगड, आदी तालुक्यातील शाळांचा समावेश होता. Science entertainment exam

यामध्ये गुहागर शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर ची विद्यार्थिनी कुमारी आर्या मंदार गोयथळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय आयुष कुंभार (आचार्य नरेंद्र देव विद्यामंदिर) भू. तालुका राजापूर, तृतीय क्रमांक अदिती जाधव( ज. ग. पेडणेकर माध्यमिक विद्यालय तालुका लांजा ),चौथा क्रमांक मिहीर भाटे (जी. प .शाळा देवरुख नंबर १), चौथा क्रमांक विभागून साक्षी आग्रे ( जि. प .पूर्ण प्राथमिक शाळा,कोंडरखंडकर तालुका रत्नागिरी), पाचवा क्रमांक संस्कृती पाते (सरस्वती विद्यामंदिर तालुका गुहागर), तर उत्तेजनार्थ सार्थक पाटील (ए .जी. हायस्कूल दापोली), श्लोक गावडे (इंग्लिश मीडियम स्कूल सावर्डे), आर्य दांडेकर (फाटक हायस्कूल रत्नागिरी) आदी विद्यार्थ्याने यश संपादन केले आहे. Science entertainment exam

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarScience entertainment examUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share88SendTweet55
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.