गुहागर, ता. 01 : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विषय कौशल्य आणि पर्यावरण नुसार जनजागृती बाबत क्षमता विकसित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्यामध्ये संसाधन संवर्धन तर सर्व बाबी विद्यार्थ्यांना शिकवल्या पाहिजे त्या अनुसंगाने 22 जुलै ते 29 जुलै 2024 या कालावधीत जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी शाळेने या शिक्षण सप्ताहाच्या नियोजनाप्रमाणे दिलेली परिशिष्ट्ये प्रत्येक दिवसी घेवून विद्यार्थ्यांना विविध क्षमता विकसित होण्यासाठी आवश्यक असलेले उपक्रम राबविले या उपक्रमामध्ये शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्यात आली. School Tavasal Tambadwadi Education Week
मुलांना मुलभूत संख्या ज्ञानाच्या दृष्टीने विविध गणितीय खेळ खेळले. क्रीडा दिवस म्हणून मुलांनी कबड्डी, लंगडी, बुद्भीबळ सारखे खेळ खेळले. सांस्कृतिक दिवस म्हणून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या धर्माचा पेहराव करून “सर्व धर्म समभाव”‘ हा संदेश दिला. ऐतिहासिक स्थळ आणि पर्यटक नेहमी भेट देत असलेल्या तवसाळ गाव पंचक्रोशी मंदिर श्री महामाई सोनसाखळी मंदिरास भेट दिली. कौशल्यावर आधारील उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांनी मातीपासून माती काम करत वेगवेगळ्या वस्तु तयार केल्या. इको क्लबची स्थापना करून वृक्ष लागवड केली. समाजाचा सहभाग म्हणून समुदाय सहभाग दिवस साजरा केला. अशा प्रकारे हा सप्ताह एकदम आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. School Tavasal Tambadwadi Education Week
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मधील असलेल्या कला सादर करायला संधी मिळाली. या उपक्रमाच्या एकच उद्देश होता आणि तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास कसा साध्य करता येईल. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळा तवसाळ तांबडवाडी शाळेचे पदवीधर मुख्याध्यापक अंकुर मोहिते, शिक्षक श्री संदिप भोये, श्री. गोकुळ गोविळ, कु.साईनाथ पुंजारा यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. School Tavasal Tambadwadi Education Week