रत्नागिरी, ता. 27 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता जिल्ह्यासाठी रक्कम रूपये २४.७३ लाख मंजूर आहेत. तरी या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी आज्ञावलीवर अर्ज भरून आपल्या नजिकच्या आपले सरकार ई-सेवा केंद्रामध्ये किंवा https://mahadbtmahait.gov.in या आज्ञावलीवर देखील अर्ज करता येऊ शकेल. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फलोत्पादनाशी निगडीत योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. Schemes related to Horticulture
या योजनेच्या अधिक माहितीसाठी गावपातळीवरील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक तसेच मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. Schemes related to Horticulture
या योजनेमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारीत रोपवाटीका, क्षेत्रविस्तार घटकांतर्गत ड्रगन फ्रुट या Exotic Fruit Crop, पुष्पोपादन, फळपिके, मसाला पिके, अळिंबी उत्पादन, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती (ग्रीनहाऊस, शेडनेट, प्लॅस्टिक मल्चिंग), फलोत्पादन यांत्रिकीकरण, मुनष्यबळ विकास कार्यक्रम, काढणीत्तोर व्यवस्थापन (पॅक हाऊस, प्रक्रिया युनिट, रायपनिंग चेंबर) आणि पणन सुविधा इ. विविध बाबींचा समावेश आहे. यामध्ये या वर्षी प्रामुख्याने मधुमक्षिका पालनासाठी तरतूद करण्यात आली आहे. Schemes related to Horticulture