लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी, ता. 15 : जिल्हा ठिकाणातील सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विषेश मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालकांनी केले आहे. Savitribai Phule Aadhaar Scheme
या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय वर्षाला भोजन भत्ता रु. २५ हजार, निवासी भत्ता रु.१२ हजार व निर्वाह भत्ता रु.६ हजार असे एकूण रु.४३ हजार इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यात वितरित करण्यात येईल. तसेच तालुकास्तरीय वर्षाला भोजन भत्ता रु. 23 हजार, निवासी भत्ता रु.१० हजार व निर्वाह भत्ता रु. ५ हजार असे एकूण रु.३८ हजार इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यात वितरित करण्यात येईल. Savitribai Phule Aadhaar Scheme
योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती
विद्यार्थी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60 टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रडेशन/CGPA चे गुण असणे आवश्यक राहील. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील. यासाठी इयत्ता १२ वी च्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल. निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान ७५% असावी. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक राहील. अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्यांचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील. विद्यार्थ्यांने स्वता:चा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलगन करणे बंधनकारक राहील. तसेच विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा. योजनेचा लाभ 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांस देण्यात येईल. Savitribai Phule Aadhaar Scheme
एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त 5 वर्षे या योजनेचा लाभ घेता येईल. इंजीनिअरिंग/वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी योजनेचा लाभ जास्तीत जास्त ६ वर्षे अनुज्ञेय असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 30 वर्षपेक्षा अधिक नसावे. योजनेची माहिती व अर्ज जिल्ह्यातील सहायक संचालक ( इतर मागास बहुजन कल्याण) यांच्याकडे ऑनलाईन /ऑफलाईन अर्ज सादर करतील. सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतिगृहाचे गृहपाल यांच्याशी संलग्न करतील. Savitribai Phule Aadhaar Scheme