रत्नागिरी, ता. 07 : राज्यस्तरीय वेटरन्स (दिग्गज) टेबल टेनिस स्पर्धा उद्यमनगर येथील नाईक हॉल येथे पार पडल्या. या स्पर्धेत राज्यभरातून १५० हून अधिक खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. SAS Sports Table Tennis Tournament Prize Distribution
आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती अॅवॉर्ड विजेत्या शिल्पा जोशी, शिवछत्रपती अॅवॉर्ड विजेत्या श्रुती कानडे-जोशी व राष्ट्रीय टेबलटेनिस खेळाडू आशा चव्हाण यांच्या एसएएस स्पोर्टसने या स्पर्धेचे आयोजन केले होते. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वेटरन्स टेबल टेनिस कमिटी, रत्नागिरी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन व ओम साई स्पोर्टस् अॅकॅडमीच्या सहकार्याने ही स्पर्धा रंगतदार झाली. या स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेत्या शैलजा साळोखे व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस वेटरन्सचे अध्यक्ष राजीव बोडस यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेला राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि रत्नसिंधू योजनेचे कार्यकारी संचालक, उद्योजक किरण तथा भैय्या सामंत यांनी शुभेच्छा दिल्या. SAS Sports Table Tennis Tournament Prize Distribution
स्पर्धेचा निकाल
पुरुष३९ वर्षांवरील गट- विजयी ओंकार जोग (पुणे), उपविजयी संतोष वाक्रडकर, ४९ वर्षांवरील- विवेक अलवाणी (पुणे), प्रसाद नाईक (एमसीडी), ५९ वर्षांवरील- कपिल कुमार (टीएसटीटीए), प्रदीप गुप्ता (पुणे),
६४ वर्षांवरील- जयंत कुलकर्णी (एमसीडी), जितू मालवणी (मुंबई उपनगर),
७० वर्षांवरील- शिवानंद कुंदजे (नाशिक), सुहास दांडेकर (एमसीडी),
७४ वर्षांवरील- विजयी पिनाकिन संपत, उपविजयी विकास सातारकर, तृतीय सतीश शिरसाठ व रविंद्र बोरकर.
महिला- ३९ वर्षांवरील- विजयी श्रुती कानडे- जोशी (ठाणे), उपविजयी स्नेहा भोळे (नागपूर),
४९ वर्षांवरील- विजयी- अनघा जोशी, उपविजयी मूनमून मुखर्जी,
६० वर्षांवरील- विजयी नीता कुलकर्णी, उपविजयी रोहिणी अलवार, तृतीय- नूतन ढिकळे,
६५ वर्षांवरील- विजयी- रंजना पत्की, उपविजयी ज्योती कुलकर्णी, तृतीय- दीपा जैन व अनुराधा वराडकर,
६९ वर्षांवरील- विजयी- मनिषा बोडस, उपविजयी शीला भैरमवार, तृतीय ज्योत्स्ना पटवर्धन.
पुरुष टीम इव्हेंट- ५९ वर्षांवरील- विजयी फोर्झा, उपविजयी टीम कूल. टीम स्मार्ट- विजयी टॉस अॅकॅडमी अ, उपविजयी क्लेव्हर मास्टर्स. SAS Sports Table Tennis Tournament Prize Distribution