संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत खोडदे या ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. लवेश पवार यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाल्यानंतर खोडदे ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच पदाचा कार्यभाग कुमारी.पुजा विलास गुरव हिने नुकताच स्वीकारला. Sarpanch Puja Guruv of Khodde


कु. पूजा विलास गुरव हिचे जागतिक महिला दिनी खोडदे ग्रामपंचायत सरपंच पदी नियुक्तीबाबत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी श्री.सुरेश केशव साळवी, श्री .राजेन्द्र पंढरीनाथ साळवी, श्री. विलास गुरव ,श्री. शरद साळवी, सदस्य सौ. तनुजा पवार, श्री. रविंद्र निवाते, श्री. बाळकृष्ण साळवी, सौ शुभांगी डिंगणकर, ग्रामसेवक सूर्यवंशी भाऊ, सौ. रेशमी साळवी, सौ. मधुरा साळवी, सौ अक्षदा मोहिते, सौ .मधुरा साळवी, सौ. जयश्री साळवी, सौ. शेवंती गुरव, सौ. निर्मल बाई, पोलीस पाटील, सौ .योगिता पवार, श्रीमती मोरे व प्राची साळवी, श्री. नितीन मोहिते, श्री. वैभव निवाते उपस्थित होते. यावेळी प्रभारी सरपंच कु. पुजा विलास गुरव यांनी आभार व्यक्त केले. असे सहकार्य आपण सर्वांनी ग्रामपंचायतीला करावे अशी भावनिक साथ घातली आणि सर्वांना मनापासून धन्यवाद दिले. Sarpanch Puja Guruv of Khodde