• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर पोलीस ग्राऊंडवर सरस महोत्सवाचे आयोजन

by Ganesh Dhanawade
December 26, 2024
in Guhagar
192 2
0
Saras Festival at Guhagar
377
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे 28 पासून प्रदर्शन व विक्री

गुहागर, ता. 26 : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती गुहागर यांच्या वतीने ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री गुहागर पोलीस परेड ग्राऊंडवर  दि. २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत लोकसहभागातून सरस महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या सरस महोत्सवामध्ये विविध कलात्मक वस्तु, कोकणी मसाले, कोकणी मेवा, कोकणी खाद्यसंस्कृती दालन इ. तसेच अस्सल ग्रामीण चवीचे खाद्यपदार्थाची मेजवानी असणार आहे. Saras Festival at Guhagar

शनिवार दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४ ते सायं. ७ वा. पर्यंत संगीत खुर्ची घेण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक आकर्षक साडी व बटवा, व्दितीय क्रमांक साडी व तळमणी, तृतीय क्रमांकास साडी देण्यात येईल. संपर्क प्रमुख : सुनीता शेट्ये ९११९४०४७२६, स्मिता बागकर ७५०७४४९१८१, सुनिधी मोहिते ८३७८८३३०८९
रविवार दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी सायं ७ ते सायं. १० वा. रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकास ५ हजार रुपये, तृतीय क्रमांक ३ हजार रुपये तृतीय क्रमांक १५०० रुपये पारितोषिक देण्यात येईल. संपर्क प्रमुख : रुपाली पवार ९४२१९०१६५३, ज्योती पालशेतकर ९४०४३२८०११. यासाठी नोंदणी फी रु. ३५० असणारं असून प्रथम ३० नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य राहील.
सोमवार दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी सायं ५ ते सायं. ७ वा.फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक साडी व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक घड्याळ व ट्रॉफी, तृतीय क्रमांक ड्रायर व ट्रॉफी. नियोजन प्रमुख : मिलन जाधव ९४०४८९९७५४, नेहा पवार – ८४६८९८०१२८ नोंदणी फी रु. ५० प्रति सदस्य, प्रथम ४० नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य राहील. केडर अभियानातील कोणतेही व्यक्ती सहभाग घेऊ शकेल. मंगळवार दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायं. ७ ते ८.३० वा. मंगळागौर, कोळी नृत्य, रात्रौ ९ वा. नमन, कोकणातील पारंपारिक सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत. तरी यात सरस महोत्सवसाठी सर्वांनी भेट द्यावी, अशी विनंती उमेद – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती, गुहागर यानी केले आहे. Saras Festival at Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSaras Festival at GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share151SendTweet94
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.