गुहागर. ता. 22 : गुहागर तालुका शिवसेना सचिव आणि पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष आग्रे यांनी आपल्या अथक परिश्रम आणि जिद्धीच्या जोरावर एल एल बी सारखी कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. तालुक्यात सर्वत्र त्याच्यावर अभिनंदन चा वर्षाव करण्यात येत आहे. Santosh Agre passed LLB exam
शालेय जीवनात असतांना पासून सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आणि त्यातही नेतृत्व करून अन्याय झाल्यास वाचा फोडण्याकरिता प्रयत्न करत असत. या त्यांच्या गुणांना कायद्याचे माध्यमातुन चालना देण्याकरिता एल एल बी ही कायद्याच्या पदवीची जोड लाभली आहे. कायद्याची परीक्षा देत असतांना सामाजिक प्रश्न सोडवणे, अडलेल्यांना मदत करणे तसेच एका राजकीय पक्षाचे सचिव पदाची धुरा सांभाळत होते. तसेच याच वेळी त्यांचा अतिशय जीव की प्राण असणाऱ्या आईचे छत्र हरपले. वडिलांचे छत्र महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना अनंतात विलीन झाले आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्यावर आली. यात छोटा भाऊ संदीप आणि बहीण गुलाब या दोन भावंडांचे शिक्षणाची जबाबदारी आली. मात्र आपल्या मेहनतीला दाद देत ती लिलाया पार केली. Santosh Agre passed LLB exam
अपार मेहनती आणि जिद्दी च्या जोरावर वयाच्या चाळीशी पार करून सुद्धा अभ्यास करण्याची इच्छा आणि मनाची तयारी करून यश गाठता येते हे दाखवून दिले. विद्यार्थी मुलांसाठी हा एक आदर्शच म्हणावा लागेल. तालुक्यात या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जातं आहे. Santosh Agre passed LLB exam