• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमराठचे सामाजिक कार्यकर्ते संजय कदम अनंतात विलीन

by Guhagar News
April 9, 2024
in Guhagar
112 1
0
Sanjay Kadam is No More
221
SHARES
630
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 09 : उमराठ गावचे सुपुत्र आणि कदम(बौद्ध) वाडीतील बौद्धजन ग्रामस्थ मंडळाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. संजय बेंडू कदम यांचे सोमवार दि. 01/04/2024 रोजी अल्पशा आजाराने मुंबई पनवेल येथील एम. जी. एम. हाॅस्पिटल येथे उपचारां दरम्याने दुःखद निधन झाले. त्यांचे वय अंदाजे ६५ होते. यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे, सून, नात असा परिवार आहे. Sanjay Kadam is No More

 कै. संजय बेंडू कदम हे उमराठ कदम(बौद्ध) वाडीच्या विकास कामांत तसेच सर्व कार्यक्रमांत सदैव सक्रिय सहभागी असायचे. ते अतिशय शांत, सरळ, सुस्वभावी, प्रेमळ, परोपकाराची व समाज कार्याची सतत तळमळ असणाऱ्या व्यक्तीमत्वाचे होते. उमराठ गावाच्या जडणघडणीत त्यांच्या कुटुंबीयांचे मोलाचे योगदान आहे.  त्यांनी ग्रामपंचायत उमराठ कार्यालयासाठी आपली जागा ग्रामपंचायत स्थापने पासूनच सन १९५९ साली बक्षीस पत्राद्वारे विनामूल्य दिलेली आहे. पुर्वी जुनी इमारत होती. त्यानंतर सन २००८ मध्ये ग्रामपंचायत उमराठची नवीन इमारत उभारण्यात संजय बेंडू कदम यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच सद्याची ठुमदार इमारत उभी राहिलेली आहे. Sanjay Kadam is No More

त्यांच्या जाण्याने कुटूंबिंयांवर आणि कदम(बौद्ध) वाडीवर दुखाःचे सावट पसरलेले आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर आणि कदम(बौद्ध) वाडीवर ओढवलेल्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोतच. त्या दुखाःतून बाहेर येण्यासाठी/ सावरण्यासाठी त्यांच्या कुटूंबिंयाना धैर्य, ताकद आणि शक्ती मिळो तसेच दिवंगत कै. संजय बेंडू कदम यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हिच आपणां सर्वांतर्फे, उमराठ बौद्धजन ग्रामस्थ मंडळातर्फे तसेच ग्रामपंचायत उमराठ परिवारातर्फे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहून ईश्वर चरणी प्रार्थना केली आहे. Sanjay Kadam is No More

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSanjay Kadam is No MoreUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share88SendTweet55
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.