सेवा सप्ताह अंतर्गत गुहागर नगरपंचायत मधील स्वच्छता कामगाराना वाटप
गुहागर, ता. 10 : सेवा सप्ताह अंतर्गत लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी च्या वतीने दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी गुहागर नगरपंचायत कार्यालय गुहागर मधील स्वच्छता कामगार यांना हॅन्ड ग्लोज, नॅपकिन्स, डेटॉल सोप, डेटॉल लिक्विड असं सॅनिटायझेशन किट देण्यात आले. सॅनिटायझेशन किट चे स्पॉन्सरर माजी उपनगराध्यक्षा स्नेहा वरंडे मॅडम यांच्या वतीने ” वरंडे विमा सेवा ” गुहागर यांनी हे साहित्य प्रदान केले. Sanitization kit distribution by Lions Club


यावेळी गुहागर नगरपंचायतीचे सीईओ श्री. स्वप्निल चव्हाण साहेब व नगरपंचायत गुहागर च्या माजी नगराध्यक्षा स्नेहा वरंडे मॅडम तसेच प्रविण जाधव स्वच्छ्ता निरीक्षक व अक्षय सावंत शहर समन्वयक, सुनिल नवजेकर लिपिक व नगरपंचायत गुहागर चे साफसफाई कर्मचारी उपस्थित होते. तसेच लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे सेक्रेटरी ला. मनीष खरे, ट्रेझरर ला. माधव ओक, व्हॉइस प्रेसिडेंट ला. सचिन मुसळे, पास्ट प्रेसिडेंट ला संतोष वरंडे सर, चार्टर्ड प्रेसिडेंट ला. शामकांत खातू, ला. सुधाकर कांबळे सर, ला. रवींद्र खरे, ला. विशाल गुहागरकर, ला. संतोष मोरे सर हे सर्व उपस्थित होते. Sanitization kit distribution by Lions Club