ठाकरे स्मृती चषक २०२४ स्पर्धेनिमित्त सचिन कोंडविलकर व मित्र परिवारातर्फे सत्कार
गुहागर, ता. 25 : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवा शिवसैनिक सचिन कोंडविलकर व मित्र परिवार यांच्यातर्फे आयोजित दोन दिवसीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक २०२४ ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयामधील विद्यार्थीनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने विविध स्पर्धांमध्ये सुयश संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. Samriddhi Ambekar’s honor


न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील इयत्ता आठवीमधील विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये राष्ट्रीय ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनात सहभाग, रत्नागिरी जिल्हास्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रथम क्रमांक, जिल्हास्तरीय गणित संबोध परीक्षेत विशेष प्राविण्य श्रेणी, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ” स्मार्ट डस्टबिन ” प्रतिकृती सादर करून सहभाग, गुहागर तालुकास्तरीय हस्ताक्षर, शुद्धलेखन व निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच विविध जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स्पर्धांमधील सुयशाबद्दल आयोजक सचिन कोंडविलकर व मित्रपरिवार यांच्या तर्फे गुहागर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व दैनिक सागरचे तालुका प्रतिनिधी गणेश धनावडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. Samriddhi Ambekar’s honor
यावेळी माजी सभापती सुनील पवार, ज्येष्ठ पत्रकार निसार खान सरगुरो, जानवळेचे उपसरपंच मुबीन ठाकूर, स्पर्धा आयोजक सचिन कोंडविलकर, पत्रकार गणेश किर्वे , उमेश शिंदे, सुरेश आंबेकर , ग्रा.पं. सदस्य मंगेश कोंडविलकर, अर्जुन शितप, अजय खाडे, अंतिम संसारे, सुदेश सकपाळ, गफार मेमन, अदनान मुजावर, उमेर बामणे आदी उपस्थित होते. Samriddhi Ambekar’s honor