पाटपन्हाळे विद्यालयातील विद्यार्थ्यींनी गुहागर तालुक्यात द्वितीय
गुहागर, ता. 07 : इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक व इयत्ता आठवी उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेतील कु.समृद्धी सुरेश आंबेकर हिने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा सर्वसाधारण ग्रामीण गुणवत्ता यादीत तालुक्यात द्वितीय क्रमांक संपादन केला आहे. Samriddhi Ambekar in Scholarship Merit List
समृद्धी आंबेकर हिने जिल्ह्यामध्ये ५५ वा क्रमांक प्राप्त केला आहे. या परिक्षेसाठी श्री.सुशांत मुंडेकर व पाटपन्हाळे विद्यालयातील शिक्षक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कु.समृद्धी आंबेकर हिने हस्ताक्षर, निबंध स्पर्धा, शुद्धलेखन, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन अशा विविध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन सुयश संपादन केले आहे. Samriddhi Ambekar in Scholarship Merit List


समृद्धी हिने शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत सुयश संपादन केल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापक व्ही.डी. पाटील, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. Samriddhi Ambekar in Scholarship Merit List