गुहागर, ता. 26 : मराठी विज्ञान परिषदतर्फे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेत विद्यार्थी गटामध्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची इ. नववीमधील विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक संपादन केला आहे. Samriddhi Ambekar 2nd in Essay Competition
मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थी गटासाठी ” इ-कचरा ” हा निबंधाचा विषय देऊन शब्द मर्यादा १५०० ते २००० होती. सदर स्पर्धा मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ( कोकण ) या प्रांतांसाठी आयोजित करण्यात आली होती . या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची इ.९वीमधील विद्यार्थिनी कु.समृध्दी सुरेश आंबेकर हिने ” इ- कचरा ” या विषयावर निबंध सादर करून राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक संपादन केला. तसेच पाटपन्हाळे विद्यालयाचे शिक्षक एस.एम.आंबेकर यांनी सदर निबंध स्पर्धेत ” प्रकाश प्रदुषण ” या विषयावर निबंध सादर करून सहभाग नोंदवला. Samriddhi Ambekar 2nd in Essay Competition
गतवर्षीही मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेत समृद्धी आंबेकर व शिक्षक एस.एम.आंबेकर यांनी निबंध सादर करून सहभाग नोंदवला होता. यंदाच्या मराठी विज्ञान परिषदेतर्फे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेत समृद्धी आंबेकर हिने द्वितीय क्रमांक संपादन केल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील, पर्यवेक्षक जी.डी.नेरले व शिक्षकवृंद तसेच मित्रपरिवार, आप्तेष्ट आदींनी अभिनंदन केले. Samriddhi Ambekar 2nd in Essay Competition