गुहागर, ता. 17 : ग्राहकांना तत्पर आणि विनम्र सेवा देणारी श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिपळूण या संस्थेच्या सर्व शाखेमध्ये युपीआय पेमेंट सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेचा शुभारंभ संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांचे हस्ते सर्व संस्थेचे संचालक मंडळ यांचे उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. Samarth Bhandari Sanstha’s UPI payment service launched
सदरची सेवा बँकेच्या युपीआय प्रमाणेच असुन यामध्ये क्यूआर कोड, युपीआय पेमेंट सेवा उपलब्ध आहे. या सेवेव्दारे संस्थेच्या खातेदारांना आपल्या खात्यामध्ये पैसे जमा करून घेण्याची व मोबाईव्दारे पैसे पाठविण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही सुविधा घेणा-या संस्थेच्या खातेदारांना कस्टमर मोबाईल अॅप देण्यात येणार असून त्याव्दारे ऑनलाईन स्टेटमेंट पहाता येणार आहे. युपीआय पेमेंट सुविधा घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्र आवश्यक असून दि. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत या सुविधेसाठी कोणतेही चार्जेस घेण्यात येणार नसल्याची माहिती यावेळी श्री. आरेकर यांनी दिली. Samarth Bhandari Sanstha’s UPI payment service launched
युपीआय पेमेंट सुविधा संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सुरू करण्यात आली असून संस्थेमध्ये खाते उघडून व्यापारी वर्गाने तसेच संस्थेच्या खातेदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री प्रभाकर आरेकर यांनी केले आहे. Samarth Bhandari Sanstha’s UPI payment service launched