गुहागर, ता. 13 : रत्नागिरी जिल्ह्यातील विश्वासार्ह पतसंस्था म्हणून नावलौकीक असलेल्या श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेच्या कर्मचा-यांना माहे सप्टेंबर २०२३ पासून व्यवस्थापन खर्चाचे आदर्श प्रमाण विचारात घेवून भरघोस पगारवाढ देण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांनी दिली. Salary increase for the employees of Samarth Bhandari Sanstha
श्री समर्थ भंडारी संस्थेने स्थापनेनंतर सातत्याने प्रगती केली असून संस्थेच्या कोकण विभाग कार्यक्षेत्रात १७ शाखांसह ०२ कलेक्शन सेंटर कार्यरत आहेत. संस्थेचे माहे सप्टेंबर २०२३ अखेर एकुण ६९७९ सभासद असून वसुल भागभांडवल रू. ०९ कोटी ५९ लाख, निधी रू.१२ कोटी ५० लाख, गुंतवणूका रू.६३ कोटी ५८ लाख, ठेवी रु. १६५ कोटी ८३ लाख, कर्जव्यवहार रू.१२७ कोटी २५ लाख, एकुण नफा रू. ०७ कोटी ८६ लाख, खेळते भांडवल रु. २०० कोटी ०५ लाख झाले आहे. संस्थेने सातत्याने सभासदांना १४% लाभांश दिला असून संस्थेला सतत ऑडीट वर्ग अ प्राप्त झालेला आहे. संस्थेने सुरक्षित कर्ज वितरण केले असून दि. ३० सप्टेंबर २०२३ अखेर थकबाकीचे प्रमाण केवळ ०.३० % आहे. Salary increase for the employees of Samarth Bhandari Sanstha
संस्थेमध्ये बँकिंगच्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध असून संस्थेने नुकतीच शाखा शिरगांव येथे मिनी एटीएम सेवा सुरू केली आहे. अशाच प्रकारची मिनी एटीएम सेवा टप्याटप्याने संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सुरु करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी श्री. आरेकर यांनी दिली. या पगारवाढी बाबत सर्व कर्मचा-यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले आहेत. Salary increase for the employees of Samarth Bhandari Sanstha