• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

समर्थ भंडारी पतसंस्थेच्या कर्मचा-यांना भरघोस पगारवाढ

by Ganesh Dhanawade
October 13, 2023
in Guhagar
110 2
1
Salary increase for the employees of Samarth Bhandari Sanstha
217
SHARES
620
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : रत्नागिरी जिल्ह्यातील विश्वासार्ह पतसंस्था म्हणून नावलौकीक असलेल्या श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेच्या कर्मचा-यांना माहे सप्टेंबर २०२३ पासून व्यवस्थापन खर्चाचे आदर्श प्रमाण विचारात घेवून भरघोस पगारवाढ देण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांनी दिली. Salary increase for the employees of Samarth Bhandari Sanstha

श्री समर्थ भंडारी संस्थेने स्थापनेनंतर सातत्याने प्रगती केली असून संस्थेच्या कोकण विभाग कार्यक्षेत्रात १७ शाखांसह ०२ कलेक्शन सेंटर कार्यरत आहेत. संस्थेचे माहे सप्टेंबर २०२३ अखेर एकुण ६९७९ सभासद असून वसुल भागभांडवल रू. ०९ कोटी ५९ लाख, निधी रू.१२ कोटी ५० लाख, गुंतवणूका रू.६३ कोटी ५८ लाख, ठेवी रु. १६५ कोटी ८३ लाख, कर्जव्यवहार रू.१२७ कोटी २५ लाख, एकुण नफा रू. ०७ कोटी ८६ लाख, खेळते भांडवल रु. २०० कोटी ०५ लाख झाले आहे. संस्थेने सातत्याने सभासदांना १४% लाभांश दिला असून संस्थेला सतत ऑडीट वर्ग अ प्राप्त झालेला आहे. संस्थेने सुरक्षित कर्ज वितरण केले असून दि. ३० सप्टेंबर २०२३ अखेर थकबाकीचे प्रमाण केवळ ०.३० % आहे.  Salary increase for the employees of Samarth Bhandari Sanstha

संस्थेमध्ये बँकिंगच्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध असून संस्थेने नुकतीच शाखा शिरगांव येथे मिनी एटीएम सेवा सुरू केली आहे. अशाच प्रकारची मिनी एटीएम सेवा टप्याटप्याने संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सुरु करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी श्री. आरेकर यांनी दिली. या पगारवाढी बाबत सर्व कर्मचा-यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले आहेत. Salary increase for the employees of Samarth Bhandari Sanstha

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSalary increase for the employees of Samarth Bhandari SansthaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share87SendTweet54
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.