• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस साहिल आरेकर

by Ganesh Dhanawade
March 6, 2024
in Maharashtra
130 1
0
Sahil Arekar as General Secretary
256
SHARES
730
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुंबई येथ रायगड- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी श्री. साहिल प्रदिप आरेकर यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल श्री. आरेकर यांची सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, जेष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, शेखर निकम आदींसह अन्य मंडळी उपस्थित होते. Sahil Arekar as General Secretary

साहिल आरेकर हे रत्नागिरी जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय जिल्हाध्यक्ष आहेत. राज्यात राष्ट्रवादी गटात फूट पडल्यानंतर शरद पवार गटात राहिलेले साहिल आरेकर यांनी कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, गुहागरचे माजी पंचायत समिती सभापती स्व. सदानंद आरेकर यांचा नातू तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुहागर तालुकाप्रमुख पद्माकर आरेकर यांचे पुतणे आहेत. घरातच राजकीय वारसा असल्याने साहिल आरेकर यांनी महाविद्यालय शिक्षण पूर्ण होताच राजकारणात सक्रिय झाले. काका पद्माकर आरेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुहागर तालुकाध्यक्ष आहेत. लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर या संस्थेच्या माध्यमातून सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात ते काम करत आहेत. सन २०१८ ते २०२२ या कालावधीत साहिल आरेकर यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदावर काम केले आहे. तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई जिल्हा केंद्र रत्नागिरीच्या युबा समन्वयक पदावर ते काम करीत आहेत. Sahil Arekar as General Secretary

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSahil Arekar as General SecretaryUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजसुनील तटकरे
Share102SendTweet64
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.