गुहागर, ता. 30 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या वतीने शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी ” रस्ता सुरक्षा दिन” ( मेगा ईव्हेंट) साजरा करण्यात आला. वाहतूक सुरळीत व्हावी व टु व्हिलर वाहन चालवताना वाहन चालकांनी हेल्मेट चा वापर करा व रस्ता क्रॉस करताना, वाहतूक नियमांचे पालन करा. असे आवाहन समुपदेशन लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी च्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक वाहन चालकांना करण्यात आले. Road Safety Day Celebration by Lions Club
आपण नेहमीच वाहतूकीचे नियम पाळा व अपघात टाळा. वाहन चालविताना मोबाईल चा वापर टाळा. रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करून चार मित्र गप्पा मारत उभे राहू नये. वाहन नेहमी सुरक्षीत पार्क करावे. आपल्या वाहनाचा वेग नियंत्रणात चालवा व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, अशी माहीती लायन्स क्लब चे प्रेसिडेंट ला. डॉ. अनिकेत गोळे, संतोष वरंडे, सेक्रेटरी मनिष खरे, माधव ओक, व्हाईस प्रेसिडेंट सचिन मुसळे, शामकांत खातू, संतोष मोरे, डॉ. मयुरेश बेंडल, नितिन बेंडल, निखिल तांबट, सुधाकर कांबळे यांनी उपस्थित वाहन चालक यांना विशेष अभिनंदन करून रस्ता सुरक्षा दिन (मेगा ईव्हेंट) निमित्त माहिती पत्रक प्रसिद्ध करून सुरक्षा संदर्भात माहिती दिली. या रस्ता सुरक्षा दिन कार्यक्रमसाठी लायन्स सदस्य व स्थानिक वाहन चालक उपस्थित होते. Road Safety Day Celebration by Lions Club