• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मासू येथे रस्त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न

by Guhagar News
May 12, 2026
in Guhagar
83 1
0
Road Inauguration Ceremony at Masu
163
SHARES
466
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : जिल्हापरिषद जनसुविधा योजनेतर्गत मासू बुद्रुक घाणातले टेप ते भाटलवाडी या  रस्त्याचे उदघाटन पंचायत समितीचे उपसभापती श्री निलेशजी सुर्वे यांच्या शुभहस्ते मोठया उत्सहात पार पडले. सदरच्या रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जागा गेल्या त्या शेतकऱ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. Road Inauguration Ceremony at Masu

उपसभापती श्री निलेश सुर्वे यांनी श्री गणेश नृत्य कलापथक भाटलवाडी यांना संबोधित करताना आता झालेल्या नवीन रस्त्याला लवकरात लवकर डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले. वाडीचे प्रमुख कार्यकर्ते श्री अंकुश आलीम यांनी रस्त्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे विशेष कौतुक  केले व मासू गावासाठी  यापुढे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून विविध कामे होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. Road Inauguration Ceremony at Masu

या उदघाटन सोहळ्यासाठी पंचायत समिती सदस्या सौ. स्नेहा शिगवण, भाजपा सरचिटणीस श्री सचिन ओक, भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष श्री विजय मसुरकर, श्री शेखर आलीम, महादेव आलीम, उपसरपंच सौ. उज्वला नाचरे, सदस्या श्रीम. शर्मिला आलीम, श्री गणेश नृत्य कला पथक भाटल वाडी अध्यक्ष श्री गंगाराम आलीम, मुंबई अध्यक्ष महेश आलीम, वाडी प्रमुख कार्यकर्ते श्री अंकुश आलीम, श्री शैलेश आलीम, अंकुश बारस्कर, प्रमोद आलीम व बहुसंख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. Road Inauguration Ceremony at Masu

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRoad Inauguration Ceremony at Masuटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.