• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिर्के प्रशालेच्या १९७० च्या बॅचचे स्नेहसंमेलन

by Guhagar News
February 10, 2024
in Ratnagiri
81 1
1
Reunion of 1970 batch of Shirke School
160
SHARES
456
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 10 : येथील रा. भा. शिर्के हायस्कूलच्या १९७० च्या जुन्या अकरावीच्या बॅचचे आठवे स्नेहसंमेलन राधानगरी, कोल्हापूर येथे उत्साहात झाले. ७० वर्षांच्या या माजी विद्यार्थ्यांचा उत्साह, उमेद आजही टिकून आहे. Reunion of 1970 batch of Shirke School

अकरावीच्या बॅचमधील विद्यार्थी २०१५ पासून हा उपक्रम राबवत आहे. दीपक कुलकर्णी यांनी याचे नियोजन केले. रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर, पुणे अशा विविध ठिकाणी विखुरलेले मित्र-मैत्रिणी आपापल्या सहचारांसमवेत यात सामील झाले. दरवेळी वेगळे ठिकाण वेगळा अनुभव घेता येईल असा प्रयत्न असतो. राधानगरी येथे गाठीभेटी, धरण गावाचा फेरफटका करून सूर्यास्त बघून सारे आनंदित झाले. नंतर प्राची शिंदे यांनी फनी गेम्स घेतले, राजकुमार प्रधान यांचे स्वरचित काव्यवाचन, श्रीकांत तेंडुलकर, सुरेशकुमार सावंत, वृंदा कुलकर्णी, संतोष कद्रेकर यांनी गाणी सादर केली. हा बहारदार कार्यक्रम रंगला. Reunion of 1970 batch of Shirke School

दुसऱ्या दिवशी दाजीपूर अभयारण्याच्या जीप जंगल सफारीचा आनंद सर्वांनी घेतला. फिरताना गवा रेड्यांचे दर्शन झाले. जंगल सफारीचा हा अनुभव सगळ्यांसाठी अनोखा होता. सतत देश-विदेश फिरणारे अशोक लांजेकर यांनी आपले प्रवास अनुभव सांगितले. सर्वजण नवीन ऊर्जा घेऊन परत भेटण्याचा वायदा करून आपापल्या गावी परतले. बॅचचे सदस्य सीए श्रीकांत वैद्य यांनी मनोगत व्यक्त करताना सुरेख नियोजन केल्याबद्दल श्री. देशपांडे व श्री. कुलकर्णी यांचे कौतुक केले. Reunion of 1970 batch of Shirke School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarReunion of 1970 batch of Shirke SchoolUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.