रत्नागिरी, ता. 28 : नियंत्रक शिधावाटप व संचालनालय नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यात गव्हाच्या आणि तूर व उडिद डाळीच्या साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्यात लागू करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली आहे. Restrictions on wheat and pulse stocks
घाऊक व्यापारी कमाल साठा ५०० टन, किरकोळ व्यापारी: प्रत्येक किरकोळ आऊटलेटसाठी कमाल ५ टन मर्यादा, बिग चेन रिटेलरः प्रत्येक किरकोळ आऊटलेटसाठी कमाल ५ टन व डेपोसाठी ५०० टन मर्यादा, प्रोसेसर मासिक स्थापित क्षमतेच्या ६०% मर्यादा प्रमाणे असेल. जिल्हा व तालुका प्रशासनास तपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत व साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कडक कारवाई आदेश देण्यात आले आहेत. आयातकांना कस्टम क्लिअरन्स दिनापासून ३० दिवसांपेक्षा अधिक साठा करता येणार नाही. मिलरसाठी मागील महिन्याचे उत्पादन / वार्षिकच्या १०% डाळींचा साठा ठेवण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. Restrictions on wheat and pulse stocks
डाळींचा साठा यावरील मर्यादेत असल्यास तसे उपभोगता मामले विभागाच्या https://tcainfoweb.nic.in/ या संकेतस्थळावर साठा जाहीर करणे बंधनकारक आहे. तरी संबंधिताना ३० दिवसाच्या आत केंद्र शासनाच्या या संकेतस्थळावर साठा नियमित अद्यावत करणे / कळविणे आवश्यक राहील. जिल्हा पुरवठा विभाग व सर्व तहसील कार्यालय (पुरवठा विभाग) यांच्याकडून आकस्मिक तपासणी केल्या जात आहेत. जिल्ह्यातील अद्याप ज्या साठा धारक / व्यापाऱ्यांनी अद्याप संकेतस्थळावर नोंदणी केली नसल्यास तात्काळ नोंदणी करावी व प्रत्येक शुक्रवारी माहिती साठा ऑनलाईन अद्यावत करण्यात यावा असेही आवाहन श्रीमती रजपूत यांनी केले आहे. Restrictions on wheat and pulse stocks