गुहागर, ता. 24 : तालुक्यातील बहुसंख्य चाकरमानी नालासोपारा, विरार, वसई तसेच मुंबई उपनगरात विखुरलेले आहेत. त्यांची गावी जाण्यासाठी चांगली सोय व्हावी म्हणून गुहागर तालुका लोकसेवा संघटनेच्या माध्यमातून नालासोपारा एस.टी डेपोच्या सहकार्याने नालासोपारा – बोरिवली – नरवण एस.टी. दि. ७. ५. २०२४ पासून नियमित सुरू करण्यात आली आहे. या एस.टी.ची नालासोपारा तसेच नरवण येथून सुटण्याची वेळ दररोज संध्याकाळी ६.०० आहे. सदर एस.टी. कार्यकर्ते, हितचिंतक आणि प्रवाशांच्या सहकार्यांने उत्तम भारमानाने चालत आहे. Response to Nalasopara – Naravan ST
सुरूवातीला सदर एसटी सुरू करण्यासाठी मुंबई सेंट्रल व विभागीय कार्यालय, कुर्ला येथे संबधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात उमराठचे सचिनभाऊ पवार शिर्के चव्हाण विकास मंडळाचे पदाधिकारी अशोक चव्हाण, रविंद्र चव्हाण, अनंत शिर्के, दिलीप कदम, सुरेश चव्हाण, संतोष शिर्के, सतिश शिर्के आणि रितेश शिर्के आणि उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर आणि मढाळच्या सरपंच अंकिता चव्हाण यांचे फार मोलाचे सहकार्य लाभलेले आहे. Response to Nalasopara – Naravan ST
तसेच दि. १२.५.२०२४ रोजी नालासोपारा डेपो येथे सदर एसटीचा स्वागत सोहळा प्रसंगी उमराठचे सचिन पवार, मढाळचे रविंद्र चव्हाण, सतिश शिर्के, हेदवीचे अजय चव्हाण, मिलिंद पाटेकर, एकनाथ चव्हाण, संतोष सुवारे, चंद्रकांत वणे, नरवण पंघरवणेचे चंद्रकांत पाटेकर, उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे सुनिल आंबेकर, नरवणचे सुनिल मोरे, वैभव फटकरे कर्देचे वैभव ठोंबरे आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहून डेपो मॅनेजर आणि सर्वांना शुभेच्छा देण्याचा छोटासा सुंदर कार्यक्रम केला. या सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन. अशीच एकजूट आणि जनजागृतीच्या माध्यमातून सक्रिय सहभाग आपण सर्वांनी ठेवून सदर एसटी भरपूर भारमानाने बारमाही कशी चालेल यासाठी प्रयत्नशील राहीले पाहिजे. Response to Nalasopara – Naravan ST
तसेच पिंपरचे विलास काजारे आणि बहुसंख्य पिंपरकर कार्यकर्ते, वेळणेश्वरचे मकरंद वैद्य यांचे सुद्धा चांगले सहकार्य लाभत आहे. गावाच्या ठिकाणी नरवण येथे नरवण ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या डायव्हर व कंडक्टर यांची राहण्याची उत्तम सोय करत असल्या बद्दल सरपंच संतोष मोरे, उपसरपंच गंगाराम बारगोडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच नरवण येथे व्यवस्था पाहणारे भार्गवराव जोशी आणि विनायक फटकरे यांचे सुद्धा उत्तम सहकार्य लाभत आहे. Response to Nalasopara – Naravan ST
सदर एस.टी.चा येण्या/जाण्याचा प्रवासाचा मार्ग सद्या नालासोपारा – बोरिवली – सायन – मैत्रीपार्क चेंबूर – पनवेल – चिपळूण – मार्गताम्हाने – मढाळ – – सुरळ – बोऱ्या फाटा – जामसूद – पिंपर – वेळणेस्वर – साखरी आगर – हेदवी मार्गे नरवण असा आहे. सदर एस.टी. चे आॅनलाईन आरक्षण नालासोपारा – चिपळूण व चिपळूण – नालासोपारा या सांकेतिक शब्दांवर सुरू आहे. Response to Nalasopara – Naravan ST
सद्याचे एस. टी. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार या एस. टी. मधून जेष्ठ नागरिक, महिला आणि १२ वर्षांखालील मुले यांना निम्म्या तिकीटीने प्रवास करू शकतात ही मोठी लाभदायक बाब आहे. शिवाय अपघात विमा आहेच. तरी सदर एस.टी. सेवेचा लाभ वसई, नालासोपारा, विरार तसेच मुंबई उपनगरातील मुंबईकर चाकरमान्यांनी अवश्य घ्यावा तसेच ही एसटी बारमाही चालू राहण्यासाठी आपापल्या वाडी/गावातील बहुसंख्य चाकरमान्यांनी याच एसटीने प्रवास करून भारमान सातत्य राखावे, असे आवाहन गुहागर तालुका लोकसेवा संघटनेचे प्रतिनिधी अजय चव्हाण, मिलिंद पाटेकर आणि रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. Response to Nalasopara – Naravan ST