गुहागर, ता. 03 : गणपतीच्या आगमनाला केवळ दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक 4 जूलैपासून खुले होणार आहे. तसेच गणेशोत्सव काळात जादा एसटी फेऱ्याही चालवण्यात येणार असून परतीचे आरक्षण सुद्धा गुरुवारपासूनच सुरु होणार आहे. Reservation of ST for Ganeshotsav begins
गणेशोत्सवासाठीचे जादा गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. प्रवाशांना वैयक्तिक आरक्षणासह समूह आरक्षणही एकाच दिवशी करता येणार आहे.सध्या धावणाऱ्या नियमित गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सुटतील. त्यासोबतच मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर या ठिकाणाहून 2 आणि 3 सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगड दरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. Reservation of ST for Ganeshotsav begins