गुहागर, ता. 31 : जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक, पालक, अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ महिला मंडळ युवा वर्ग उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर देश भक्ती समुह गीत सादर केली. प्रभात फेरीत काढण्यात आली यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणा देण्यात आल्या. Republic Day in Tawasal School
![Republic Day in Tawasal School](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/01/gn3064-1024x576.jpg)
![Republic Day in Tawasal School](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/01/gn3064-1024x576.jpg)
यावेळी सन २०२४/२५ केंद्रीय क्रीडा स्पर्धेत आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडीचे नाव केंद्रीय क्रीडा स्पर्धेत, बिट स्तरावर, तालुका स्तरावर जिल्हा स्तरापर्यंत गरुडझेप घेतली होती. या सर्व खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला मंडळ यांनी देशाचे शांतीचे प्रतिक म्हणून तिरंगा रूपी सफेद रंगाची साडी परिधान करून सामाजिक संदेश दिला. Republic Day in Tawasal School
![Republic Day in Tawasal School](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/01/gn3062-1024x460.jpg)
![Republic Day in Tawasal School](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/01/gn3062-1024x460.jpg)
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक अंकुर मोहिते, श्री संदिप भोये, श्री साईनाथ पुजार व अंगणवाडी सेविका श्रीमती संगीता सुर्वे मॅडम यांनी केले होते. यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले. Republic Day in Tawasal School
![Republic Day in Tawasal School](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/01/gn3061-1024x528.jpg)
![Republic Day in Tawasal School](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2025/01/gn3061-1024x528.jpg)