• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी विभागप्रमुख यांना ग्राहक पंचायतीतर्फे निवेदन

by Guhagar News
October 22, 2024
in Ratnagiri
118 1
3
Representation by Customer Panchayat to Head of Department

Representation by Customer Panchayat to Head of Department

231
SHARES
660
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गळक्या आणि हेडलाइट नसलेल्या नालासोपारा-रत्नागिरी एसटीबाबत

रत्नागिरी, ता. 22 : गळक्या आणि हेडलाइट नसलेल्या नालासोपारा-रत्नागिरी एसटीबाबत तसेच बसमधील कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाबाबतचे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या रत्नागिरी शाखेतर्फे एसटीचे रत्नागिरी विभागप्रमुख प्रज्ञेश बोरसे यांना देण्यात आले. Representation by Customer Panchayat to Head of Department

एसटीच्या एक प्रवासी सौ. प्रज्ञा सावंत यांनी एसटी बसमधील असुविधा, कर्मचाऱ्याचे उद्धट वर्तन आणि बसमधील गैरसोयीबाबत तक्रारवजा पत्र ग्राहक पंचायत (महाराष्ट्र) या संस्थेच्या रत्नागिरी शाखेकडे पाठवले होते. त्यांनी गेल्या ६ ऑक्टोबर २०२४ रोजी नालासोपारा-रत्नागिरी एसटी बसमधून चिपळूण ते रत्नागिरी या प्रवासात मिळालेल्या विपरीत अनुभवाविषयी त्यात लिहिले आहे. या तक्रारी गंभीर आहेत आणि एसटी महामंडळाने तातडीने दखल घेण्यासारख्या आहेत, असे नमूद करून ग्राहक पंचायतीतर्फे विभाग प्रमुखांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, नालासोपारा-रत्नागिरी ही एसटी बस संपूर्णपणे गळत होती. तेव्हाच पाऊस सुरू असल्याने प्रवाशांना भिजत प्रवास करावा लागला. बसला हेडलाइट नव्हते. अपुऱ्या प्रकाशामुळे एसटी बस वाटेत थांबवावी लागली. चालकाने तात्पुरती दुरुस्ती करून हेडलाइट लावण्याचा प्रयत्न केला. Representation by Customer Panchayat to Head of Department

त्यानंतर बस पुढे मार्गस्थ झाली. सौ. सावंत यांना रत्नागिरीजवळच्या महालक्ष्मी येथे उतरायचे होते. तसे त्यांनी कंडक्टरला सांगितले. पण कंडक्टरने त्यासाठी त्यांच्या तिकिटाची मागणी केली. तिकीट परत द्यायचे नसेल, तर महालक्ष्मी येथे एसटीचा थांबा नसल्यामुळे कुवारबाव येथे उतरावे लागेल, असे त्यांनी सांगितले. खरेदी केलेले तिकीट ही प्रवाशाचीच मालमत्ता असते. कोणत्याही स्थितीत ते कंडक्टरला परत करणे चुकीचे होते. तशी मागणी कंडक्टरने करणेही चुकीचे होते. या साऱ्या प्रकाराबाबतची तक्रार देण्यासाठी सौ सावंत यांनी कंडक्टरकडे तक्रार पुस्तक मागितले, मात्र तशी कोणतीही व्यवस्था नसल्याचे त्याने सांगितले. एसटी बसमधील गैरसोयी, गळती, हेडलाइट नसणे या साऱ्याला आपण जबाबदार नसल्याचेही कंडक्टरने सांगितले. Representation by Customer Panchayat to Head of Department

ग्राहक पंचायतीकडे ही तक्रार आली असल्यामुळे याबाबतची चौकशी करून प्रवासी म्हणून सौ. सावंत यांना व्यक्तिशः तसेच ग्राहक पंचायतीला चौकशीचा अहवाल शक्य तितक्या तातडीने द्यावा, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. सौ. सावंत यांनी ग्राहक पंचायतीकडे दिलेल्या पत्राची पत्राची झेरॉक्स प्रत तसेच एसटीची छायाचित्रेही सोबत जोडण्यात आली. निवेदन देताना ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष संदेश सावंत, सचिव आशीष भालेकर, सहसंघटक उमेश आंबर्डेकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ही बस पालघर विभागातील नालासोपारा आगाराची असल्याने ग्राहक पंचायतीची तक्रार त्या विभागाकडे तातडीने पाठविली जाईल, असे आश्वासन श्री. बोरसे यांनी दिले. Representation by Customer Panchayat to Head of Department

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarRepresentation by Customer Panchayat to Head of DepartmentUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share92SendTweet58
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.