आबलोलीतील वाहनचालक आणि ग्रामस्थांची पत्रकारांकडे मागणी
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील आबलोली येथे रहदारीच्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या खडीमुळे अपघात होत आहेत. तरी सुरक्षीत वहाने चालवता यावीत यासाठी या रस्त्यावरुन हि खडी ताबडतोब हटविण्यात यावी, अशी मागणी वाहन चालक आणि ग्रामस्थांनी आबलोली ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम खाते गुहागर याच्याकडे केली आहे. Remove gravel and avoid accidents


आबलोली येथे हॉटेल सिध्दीविनायक शेजारी आणि आबलोली गावच्या नवलाई देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी असलेल्या कमानी समोर श्री गणेश मंदिरा जवळ भर रस्त्यात खडी टाकण्यात आलेली आहे. हि खडी पसरली जात असल्याने अपघात होत आहेत. तरी निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि सार्वजनिक बांधकाम विभाग गुहागर यांनी आपली जबाबदारी ओळखून अपघात टाळण्यासाठी हि खडी रस्त्यावरुन हटवून बाजूला रस्ता सोडून ठेवावी. हॉटेल सिध्दीविनायक शेजारी भररस्त्यात पसरलेली खडी हॉटेल व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश कारेकर, रामू कदम, प्रणय कदम यांनी स्वतः मेहनत घेऊन एकत्र करुन ठेवली आहे. परंतू वाढती वाहतूक पहाता हि खडी पुन्हा रस्त्यात पसरुन अपघात होऊ शकतात. तरी आबलोली ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम खाते गुहागर यांनी ताबडतोब हि खडी हटवा व अपघात वाचवा अशी आग्रही मागणी वाहन चालक, पादचारी व ग्रामस्थांकडून आबलोलीतील स्थानिक पत्रकारांकडे करण्यात आली आहे. Remove gravel and avoid accidents

