गुहागर, ता. 02 : रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित रिगल कॉलेज शृंगारतळी या महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. Regal College Shringaratali Admissions Start
यामध्ये १००% नोकरीची हमी देणारा हॉटेल मॅनेजमेंट डिग्री व डिप्लोमा तसेच मॅनेजमेंटच्या शिक्षणाची संधी देणारे बी.बी.ए.(बॅचलर ऑफ बिजिनेस ॲडमिनिस्ट्रेशन) व बी.एम.एस.(बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.बॅचलर ऑफ कॉम्पुटर ऍप्लिकेशन (बी.सी.ए.) & COPA या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्याना IT सेक्टरमध्ये नोकरी मिळते. BCA या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १२ वी कोणतीही शाखा उत्तीर्ण तसेच BCA प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. फॅशन इंडस्ट्री मध्ये करिअर ची संधी देणारा आणि आयुष्यामध्ये नवे रंग भरणारा कोर्स फॅशन डिझायनिंग डिग्री व डिप्लोमा,रुग्णांची सेवा घडवणारा व सुसज्ज हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी देणारा नर्सिंग हा कोर्स. तसेच MSEB मध्ये नोकरीची संधी देणारा इलेक्ट्रिशियन कोर्स, पॅरामेडिकल कौन्सिलची मान्यता असलेला डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन (DMLT )हा कोर्स पूर्ण केल्यावर विद्यार्थी लॅब टेक्निशियन म्हणून नामांकित हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात तसेच पॅरामेडिकल कौन्सिलची नोंदणी करून स्वतःची पॅथॉलॉजी लॅब टाकतात. प्रशासकीय सेवा,कायदेशीर सल्लागार,प्राध्यापक यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देणारा एम.ए.(पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन) या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. Regal College Shringaratali Admissions Start


यावर्षीपासून ११ वी शास्त्र(plain) MHT-CET स्पेशल बॅच रिगल कॉलेज शृंगारतळी येथे सुरू होत आहे त्यासाठी कोटा पॅटर्नचे अनुभवी प्राध्यापक वर्ग मार्गदर्शन करणार आहेत. तसेच CBSE मान्यताप्राप्त रिगल पब्लिक स्कूलसाठी नर्सरी ते इयत्ता दुसरी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. १२ वी उत्तीर्ण SC/ST/NT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश तसेच OBC/SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शिष्यवृत्ती तसेच OPEN प्रवर्गातील विद्यार्थ्यांना SEBC/EWS शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. वरील सर्व अभ्यासक्रमासाठी आजच प्रवेश घेऊन आपले उज्वल भवितव्य निश्चित करावे, असे आवाहन रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या प्राचार्या.सौ.रेश्मा मोरे यांनी केले आहे. Regal College Shringaratali Admissions Start