गुहागर, ता. 26 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या रिगल कॉलेज शृंगारतळी मधील बीबीए विभागाच्या विद्यार्थ्यांना दिनांक 14 फेब्रुवारी २०२४ रोजी व्यवसायातील प्रात्यक्षिक ज्ञान मिळवण्यासाठी गुजरात मधील अमुल डेअरी मध्ये एक दिवसीय क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. सदर क्षेत्रभेटीमध्ये उत्पादनासंदर्भात तसेच उत्पादनामध्ये गुणवत्ता राखण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. अमूल डेअरीच्या या प्लांटमध्ये दररोज 30 लाख लीटर दुधाची आयात विविध गावांमधून होत असते. दुधाचे आयात होत असताना सर्वप्रथम त्या दुधाची चाचणी केली जाते त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. Regal College field visit to Amul Dairy


त्यानंतर अमुलद्वारे तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांची माहिती देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना दूध व दुग्धजन्य तयार होणाऱ्या विभागाकडे नेण्यात आले त्यात सर्वप्रथम दुधावर प्रक्रिया करून दूध पॅकिंग तसेच दूध पावडर, ताक, बटर, सेंट्रल लॅबोरेटरी आणि क्वालिटी कंट्रोल इत्यादी विभागांना भेट देण्यात आली. येथील व्यवस्थापन आणि शिस्तबद्धता बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपल्या उत्पादनांची गुणवत्ता टिकून राहावी यासाठी नैसर्गिक संवर्धके वापरून उत्पादन कसे टिकवून ठेवता येईल याचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले. डेरी उत्पादने घेत असताना टाकाऊ घटकांचे व्यवस्थापन कसे केले जाते व त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन याचे महत्त्व कळाले सदर क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळाली. क्वालिटी कंट्रोल विभागामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उत्पादनांवर होणाऱ्या चाचण्या अनुभवता आल्या तेथील काम कसे चालते आणि ते किती महत्त्वाचे आहे हे कळले. Regal College field visit to Amul Dairy


सदर क्षेत्रभेटीमध्ये पी आर ओ म्हणजेच पब्लिक रिलेशन ऑफिस या विभागाला भेट देण्यात आली येथे मानवी संसाधन विकास आणि योग्य ग्राहक संबंध याविषयी माहिती मिळाली. या क्षेत्रभेटीसाठी रिगल कॉलेज शृंगार तळी बीबीए विभागातील प्रा. श्री. शाहरुख चौगुले आणि प्रा. सौ. सुखदा पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले. रीगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री. संजय राव शिर्के, संचालिका मा.डॉ. सुमिता शिर्के तसेच रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे मार्गदर्शनाखाली या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. Regal College field visit to Amul Dairy