लेखक : आशिष प्रकाश बल्लाळ, चिपळुण
Guhagar News : आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती. बाबासाहेब म्हटलं की त्यांच्या नावापुढे एक विशेषण लावले जाते ते म्हणजे ‘दलितांचे उद्धारक’. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांनाच नव्हेतर भारतीय जनतेसाठी आपले जीवन व्यतीत केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ध्येयधोरणे, नदीजोड प्रकल्प, धरणांची निर्मिती, महिला सक्षमीकरण, कामगारांचे धोरण अशा अनेक विषयांत संविधानकर्त्या डॉ. आंबेडकरांनी या देशाला अनेक विषयात त्यांनी देशाला दिशा दाखवली आहे. Redeemer of Indian people Dr. Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजुन घ्यायचे असतील तर प्रथम बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्विकारला म्हणुन त्यांच्याबद्दलची असलेली द्वेषभावना मनातुन काढायला हवी. त्यांच्या कार्याचा अभ्यास करणे, त्यांच्या विचारांचे पाईक होणे, त्यांच्या अनुयायांना सन्मानाने आपल्या सोबत घेणे, हे काम आपल्याला करणे आवश्यक आहे. तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने आपण समजून घेतले असे म्हणता येईल. Redeemer of Indian people Dr. Ambedkar
तत्कालीन राजकारणात सक्रीय होण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयाचे दोन वर्षे प्राचार्य म्हणूनही काम पाहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवणारे पहिले भारतीय आहेत. विशेष म्हणजे ही पदवी त्यांनी परदेशातून घेतली आहे. आपल्या समाजाला सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा दूर व्हाव्यात म्हणून संघर्ष करु लागलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाजाला संरक्षण मिळावे म्हणून स्वातंत्र्य चळवळीत, तत्कालीन राजकारणात सक्रीय झाले. अल्पावधीत ते भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे नेते बनले. या प्रवासातही त्यांच्या मनात अंत्योदयचा विचार जागता होता. म्हणूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील प्रत्येक संधीचा उपयोग समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा राहीला. आपल्या राजकीय कारकिर्दीत भारतीय संविधानातील कलम ३७०, जे जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देत होते, याला डॉ. आंबेडकरांनी कडाकडून विरोध केला होता. Redeemer of Indian people Dr. Ambedkar
भारत देशात जन्मलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. कारण बाबासाहेबांनी स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव न करता समान कामाला समान दाम हा अधिकार महिलांना दिला. महिलांना फारकतीचा अधिकार, महिला कामगार संरक्षण कायदा डॉ. बाबासाहेबांनी दिला. महिला प्रसुती पगारी रजेचा ठराव संसदेत मांडुन तो संमत करुन घेतला. अमेरीकेसारख्या देशात महिलांना मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी मोठा लढा दयावा लागला होता. मात्र स्वतंत्र भारतात महिलांना मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला नाही. हे लक्षात घेतले पाहीजे. डॉ. बाबासाहेब म्हणतात की, एखाद्या देशाची प्रगती मोजण्याची फुटपट्टी काय असावी तर , ‘ ज्या देशात स्त्रीयांची प्रगती झाली असेल तोच देश प्रगत मानला पाहीजे’. भारतीय महिलांना भारताच्या संविधानातुन मतदानाचा हक्कासह संसदेत विविध कायदे करुन महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतातील स्त्रीयांचे उद्धारकर्ते आहेत. Redeemer of Indian people Dr. Ambedkar


१९४२ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सन २००० मध्ये भारतीयांना किती पाणी लागेल याचा आराखडा तयार करण्याच्या सुचना संबंधीत विभागाला केली होती. पाण्याच्या एका थेंबासाठी ज्या माणसाच्या पिढ्यांनी त्रास सहन केला तो माणुस भारत देशाच्या पुढच्या साठ वर्षाच्या पाण्याचे आणि ऊर्जेचे नियोजन करीत होता. याच वेळी बाबासाहेबांनी देशातील पंधरा धरणांच्या कामाची सुरवात केली त्यात हिराकुड धरण, दामोदर खोरे प्रकल्प, ओरीसा नदी, भाक्रानांगल धरण इ. देशातील महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. देशातील मोठमोठया नदया जोडण्याच्या नदीजोड योजनेचे जनकही डॉ.बाबासाहेब आंबेडकरच आहेत. भारतातील शेती व शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यासाठी १९१८ साली ‘स्मॉल होल्डींग्ज इन इंडीया’ हा शोधग्रंथ त्यांनी लिहीला होता. Redeemer of Indian people Dr. Ambedkar
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ग्रंथावर आधारीत असलेली मार्गदर्शक तत्त्वे, कार्यशैली आणि दृष्टीकोन यातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संकल्पना हिल्टन यंग आयोगासमोर मांडली. त्याचा आधार घेवूनच भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) स्थापना डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार झाली. भारताचे कामगारमंत्री असताना भारतीय कामगार परिषदेच्या सातव्या अधिवेशनात डॉ. आंबेडकरांनी भारतात कामाचे तास १४ तासांवरून ८ तासांवर आणले. ओबीसींना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव नेता व देशातील सर्वात मोठ्या जनसमुदायाचे उद्धारकर्ते आहेत. Redeemer of Indian people Dr. Ambedkar
स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारमध्ये पहिले कायदामंत्री म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जबाबदारी स्विकारली आणि भारतासाठी स्वतंत्र संविधानाची निर्मिती करण्यात पुढाकार घेतला. हे भारताचे संविधान वाचल्यावर आपल्याला भारतीय नागरीक म्हणुन आपले मुलभुत अधिकार व देशाप्रती आपली जबाबदारी काय आहे हे समजते. डॉ. आंबेडकरांनी १९५५ साली मध्यप्रदेशाचे उत्तर आणि दक्षिण अशा दोन राज्यांमध्ये विभाजन करण्याचा तसेच बिहारचेही विभाजन करण्याचा सल्ला दिला होता, जेणेकरून या राज्यांचा समतोल आणि चांगला विकास होऊ शकेल. जवळपास ४५ वर्षांनंतर, वर्ष २००० मध्ये हे दोन्ही राज्य विभाजित झाले आणि छत्तीसगड व झारखंडची निर्मिती झाली. Redeemer of Indian people Dr. Ambedkar