दि. 9 मार्च रोजी श्री सोमनागेश्वर सेवा मंडळ व नाट्य कलामंच तळवली यांचे आयोजन
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील तळवली येथे श्री सोमनागेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री महोत्सवानिमित्त शनिवार दि. 9 मार्च रोजी तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स शिव करंडक 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ग्रुप व सोलो या दोन प्रकारात पार पडणार आहेत. Record Dance Competition at Talwali
यातील समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकास रोख रु. 5 हजार 1 व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास रोख रु. 3 हजार 1 व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास रोख रु. 1 हजार 501 व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांकास रोख रु. 701 व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तर वैयक्तिक नृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रु. 2 हजार 1 व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास रोख रु.1 हजार 501 व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास रोख रु. 1 हजार 1 व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांकास रोख रु. 501 व सन्मान चिन्ह तसेच उत्तेजनार्थ म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. Record Dance Competition at Talwali
समुह नृत्य स्पर्धेसाठी 300 रु. तर वैयक्तिक नृत्य स्पर्धेसाठी 100 रु प्रवेश शुल्क असणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम दि. 1 मार्च असून अधिक माहितीसाठी आशिष कारेकर 9422505613, अमित पोफळे 9527314696 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. Record Dance Competition at Talwali