नवागतांच्या स्वागतासाठी मान्यवरांची मांदियाळी
गुहागर, ता. 25 : रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दिनांक 24 जुलै 2024 रोजी विविध विभागांमधील प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ रेश्मा मोरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर सरस्वती पूजन व इशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. Reception at Regal College
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ. लीना भागवत, (गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती,गुहागर), मा श्री नासिम मालाणी, (सर्वेसर्वा मालाणी मार्ट, शृंगारतळी), मा श्री उमेश जाधव, (प्राध्यापक ज्युनिअर कॉलेज, अंजनवेल) उपस्थित होते तसेच रिगल कॉलेज शृंगारतळी, स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. Reception at Regal College
प्रास्ताविकेमध्ये सौ मोरे यांनी रीगल कॉलेजमध्ये उपलब्ध विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची तसेच त्यासाठी मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्तीची माहिती दिली तसेच शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये घेतलेले विविध उपक्रम व थीम डिनर विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या शैक्षणिक वर्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या 100% प्लेसमेंट बद्दल माहिती दिली विद्यार्थ्यांनी आपल्या व्यवसायिक आणि सर्वांगीण विकासासाठी रिगल कॉलेजची निवड केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. Reception at Regal College
त्यानंतर अंतरा कदम, प्रणय पोरे, निर्जला मोहिते, विशाखा शिगवण, प्रणिता गवळी या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये दर्जेदार शिक्षण देऊन सर्वांगीण विकास केल्याबद्दल रिगल कॉलेजचे आभार व्यक्त केले. तसेच रिगल कॉलेज शृंगारतळीच्या सर्व प्राध्यापकांनी नवीन विद्यार्थी व पालकांना आपली ओळख करून दिली. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवरांचा सत्कार रिगल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका मा डॉ.सुमिता शिर्के यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. Reception at Regal College
श्री उमेश जाधव यांनी विद्यार्थ्यांनी व्यवसाय किंवा नोकरी करत असताना जगापेक्षा वेगळा विचार केला पाहिजे तसेच मेहनत करून संधी शोधून तिचं सोनं करता आलं पाहिजे त्यासाठी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करण्याचा गुरु मंत्र दिला आणि मा श्री संजय राव शिर्के तसेच मा डॉ सुमिता शिर्के यांनी स्थानिक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी त्यांचे आभार मानले. रिगल कॉलेज शृंगारतळी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष मा श्री महेंद्र कदम यांनी आपल्या मनोगतमध्ये विद्यार्थ्यांना रिगल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यामुळे उज्वल भवितव्याची ग्वाही दिली तसेच हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना, ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत शैक्षणिक सुविधेचा लाभ करून दिल्याबद्दल रीगल कॉलेज शृंगारतळी यांचे आभार मानले. Reception at Regal College
त्यानंतर मा. श्री.धुमाळ सर यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची जबाबदारी कळावी यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञानही तितकेच महत्त्वाचे आहे आणि ते रिगल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मिळते असे मत व्यक्त केले. मा सौ लीना भागवत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सावित्रीबाई फुले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ यांना अभिवादन करून कार्यक्रमाचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल रिगल कॉलेजचे आभार मानले. कोणताही महत्त्वाचां निर्णय घेताना त्याचे पुढील परिणाम जाणून घेऊन मग योग्य तो निर्णय घ्या, तसेच करिअर करताना त्यात जिद्द, भाषा, गणवेश, मोबाईलचा योग्य वापर याचे महत्त्व पटवून दिले. तसेच रिगल एज्युकेशन सोसायटीचे कौतुक केले. Reception at Regal College
त्यानंतर रीगल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका मा डॉ सुमिता शिर्के यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात दर्जेदार शिक्षण त्यांच्या गावाजवळ मिळावे व त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्या या उद्देशाने रीगल एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली असे सांगितले. व यासाठी रीगल एज्युकेशन सोसायटी नेहमी कार्यरत राहील असे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यात रिगल थीम डान्स तसेच कोळी नृत्य आणि मंगळागौर व स्वागत गीत यांचा समावेश होता. नंतर विद्यार्थी व पालकांना न्याहारीची सोय करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सौ सोनाली मिरगल व आभार प्रदर्शन प्रा श्री वृणाल बेर्डे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. Reception at Regal College